बुलढाणा,
chhatrapati-sambhaji-maharaj-birth-anniversary : छत्रपती विर संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त दि. १५ मे रोजी सायकांळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक संगम चौक येथून भव्य दिव्य शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली. या शोभायात्रेत धर्मवीर आराखडा व कलारी आखाडा्यातील तरूण तरूणींनी तलवारबाजी दाडपट्टा भाल्याचे प्रात्यक्षिक सादर केले. सुभेदार तानाजी मालसुरे यांचा सिंह गेला पण गड आला भावनिक देखावा सादर करण्यात आला. महापुरुषांचे आकर्षक रोषणााईने आकर्षक देखाावे अश्वारुढ वेषभूषेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज माँ जिजाऊचे सादरीकरण सर्वाचे लक्ष वेधून घेत होते.
या शोभायत्रेत आ. संजय गायकवाड नगराध्यक्ष पूजा गायकवाड शिवसेना गटनेते मृत्यूंजय गायकवाड, धर्मवीर आखाड्याचे पृथ्वीराज गायकवाड सर्व नगरसेवक सभापती उत्सव समितीचे पदाधिकारी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.