नागपूर,
Ramkrishna Nagar राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि लोककल्याण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जय वीर हनुमान मंदिर, रामकृष्ण नगर, दिघोरी येथे आयोजित करण्यात आलेल्या बाल संस्कार शिबिराचा समारोप १३ मे २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. हे शिबिर ६ मे ते १३ मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. समारोप कार्यक्रमाला नंदनवन नगराचे कुटुंब प्रबोधन प्रमुख सुधीर गुप्ता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर संस्कार वर्गातील मुलामुलींनी आपल्या माता-पित्यांचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले.

यावेळी सुधीर गुप्ता यांनी माता-पित्यांच्या पूजनाचे महत्त्व विषद करताना श्री गणपती आणि कार्तिकस्वामी यांची कथा प्रभावी शब्दांत सांगितली व उपस्थितांना सुंदर मार्गदर्शन केले. शिबिरामध्ये वर्गशिक्षिका कोमल काळे यांनी मुलांना चित्रकला, रामरक्षा, मारुती स्तोत्र, हनुमान चालीसा, पसायदान तसेच विविध बोधप्रद गोष्टींचे शिक्षण दिले. Ramkrishna Nagar कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर सेवा प्रमुख सतीश देशपांडे यांनी केले, तर दीपाली वैद्य यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी निशा आमगिरे, पल्लवी सोनटक्के, जयश्री नांदुरकर, पूनम धांडे, शीतल बांते, मयुरी चकोले, रेखा वैद्य, सारिका देवगडे, दीपिका रामटेके,प्रणाली देवगडे, शिल्पा नींडेकर, आरती कुथे, वर्गशिक्षिका कोमल काळे तसेच सहशिक्षिका दीपाली वैद्य यांचे विशेष सहकार्य लाभले. Ramkrishna Nagar कार्यक्रमाच्या शेवटी सुधीर गुप्ता यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नोटबुकचे वाटप करण्यात आले. या समारोप सोहळ्यास मोठ्या संख्येने पालक आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
सौजन्य: सतीश देशपांडे, संपर्क मित्र