दारव्हा केमिस्ट संघटनेची बैठक

    दिनांक :15-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
दारव्हा, 
darwha-chemists-association-meeting : येथील विश्रामगृहात मंगळवार, 12 मे रोजी केमिस्ट संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक झाली. बैठकीला तालुक्यातील अनेक केमिस्ट बांधवांनी उपस्थित राहून संघटनेप्रती असलेली एकजूट व बांधिलकी दर्शविली. या बैठकीत येत्या 20 मे रोजी आयोजित अखिल भारतीय औषध विक्रेता बंद संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. ऑनलाइन औषध विक्री व कॉर्पोरेट स्पर्धेविरोधात अखिल भारतीय स्तरावर होणाèया या बंदला दारव्हा तालुक्यातील सर्व औषध विक्रेत्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला.
 
 
JKLK
 
 
 
बंद यशस्वी करण्यासाठी आवश्यक नियोजन, पुढील दिशा व विविध जबाबदाèयांची रूपरेषा निश्चित करण्यात आली. संघटनात्मक बळकटी, सदस्यांच्या अडचणी व भविष्यातील उपक्रम यावरही सदस्यांनी आपली मते मांडून महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
 
 
बैठकीला उपस्थित राहून सहकार्य करणाèया सर्व सदस्यांचे संघटनेच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष नीलम सिंगी, प्रमोद राठी, सचिव गिरीश सुर्वे व अन्य सदस्य उपस्थित होते.