मुंबई,
Dhurandhar 2 is now on OTT 'धुरंधर: द रिव्हेंज या रणवीर सिंगच्या बहुचर्चित चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होऊन जवळपास दोन महिने उलटले असले तरी, या अॅक्शन सिक्वेलची क्रेझ अजूनही कायम आहे. भारतात ११०० कोटी रुपयांहून अधिक कमाई करणाऱ्या या चित्रपटाने जागतिक स्तरावरही मोठा गल्ला जमावला असून आता प्रेक्षकांना त्याच्या ओटीटी रिलीजची उत्सुकता लागली आहे. १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या डिजिटल प्रदर्शनाबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. दरम्यान, चित्रपटाचा स्ट्रीमिंग पार्टनर असलेल्या JioHotstar ने सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ शेअर करत चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. “धमाका लवकरच येत आहे” असा संदेश देत निर्मात्यांनी ओटीटी रिलीजचा इशारा दिला आहे.

अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी, हा चित्रपट २२ मे रोजी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. याआधी काही रिपोर्ट्समध्ये ‘धुरंधर २’ १५ मे रोजी ओटीटीवर येणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकतेसोबतच संभ्रमही कायम आहे.दरम्यान, परदेशातील प्रेक्षकांसाठी हा चित्रपट आधीच Netflix वर प्रदर्शित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, परदेशात उपलब्ध असलेल्या आवृत्तीत काही अनकट आणि सेन्सॉर न केलेली दृश्ये दाखवण्यात आली आहेत. ‘धुरंधर: द रिव्हेंज रॉ’ आणि ‘अनदेखा’ या नावाने उपलब्ध असलेल्या या आवृत्तीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.