औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर औषध प्रशासन सज्ज

नागरिकांना औषध पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना

    दिनांक :15-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
drug-vendor-strike : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या वतीने बुधवार, 20 मे रोजी देशव्यापी एक दिवसीय बंदची घोषणा करण्यात आली असून या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांना औषधांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत.
 
 
jlk
 
 
 
प्रलंबित मागण्यांच्या निषेधार्थ देशातील ठोक व किरकोळ औषध विक्रेत्यांनी व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. मात्र, नागरिकांना आवश्यक औषधे वेळेत उपलब्ध व्हावीत यासाठी अन्न व औषध प्रशासन, सहायक आयुक्त (औषधे) डॉ. अ. मा. माणिकराव यांनी याबाबत माहिती दिली.
 
 
जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते, रुग्णालयांशी संलग्न औषध दुकाने तसेच 24 तास सुरू असणाèया औषध दुकानांशी समन्वय साधण्यात येत असून अत्यावश्यक औषधांचा पुरवठा खंडित होऊ नये यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देशही त्यांना देण्यात आले आहेत.
 
 
जिल्हाधिकारी, पोलिस प्रशासन, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, इंडियन मेडिकल असोसिएशन, खाजगी व निमसरकारी रुग्णालये यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवून आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. प्रत्येक तालुका व गाव पातळीवर आवश्यक औषध दुकाने सुरू राहतील यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
 
 
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे. औषध पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण उद्भवल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा किंवा 9850150687 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.