दिग्रसच्या ‘जॉगिंग ट्रॅक’वर दारूड्यांचा उच्छाद

रस्त्यावर फेकलेल्या दारूच्या बाटल्या

    दिनांक :15-May-2026
Total Views |
अभय इंगळे,
दिग्रस, 
digras-jogging-track : येथील रहदारी नसलेला शहरातील एकमेव जुना दारव्हा मार्ग हा आता दारू ढोसणाèयांसाठी मस्त ‘सोयीचा’ झाला. तर सकाळी व संध्याकाळी फिरणाèयांसाठी मात्र डोकेदखी झाल्याने प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
 
 
y15May-Batalya
 
 
 
शहरातील जुना दारव्हा मार्ग म्हणजेच येथील ‘जॉगिंग ट्रॅक’ हा फिरणाèयांसाठी अत्यंत उपयुक्त असून शेकडो महिलांसह नागरिक शांत असे हे 4 किलोमिटर अरुणावती धरणापर्यंत दररोज फिरतात. आजूबाजूला हिरवे शेत शिवार, शुद्ध हवा असल्याने बहुतांश नागरिक याच ‘जॉगिंग ट्रॅक’चा उपयोग घेत आहेत.
 
 
मात्र काही दिवसांपासून या मार्गावर फिरणे मुश्किल झाले आहे. या मार्गावरील झाडांचा आडोसा घेऊन दारू ढोसणारे दिवसेंदिवस वाढतच आहेत. यावर कळस म्हणजे यातील काही मानसिक विकृत दारूडे रिकाम्या बाटल्या रस्त्यावर फोडत असल्याने यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी आहे.
 
 
सकाळी फिरणाèयांच्या रस्त्यावर काचा निदर्शनास आल्या. त्या काचा बीअरच्या बाटलीच्या होत्या. याच मार्गावर वाईन शॉप आहे. येथे दारू पिण्याचे पैसे लागतात म्हणून दारूडे या ‘जॉगिंग ट्रॅक’वर रस्त्याच्या कडेला बसून दारू ढोसतात. मस्तीत येवून खाली दारुच्या बाटल्या रस्त्यावर फेकून निघून जातात.
 
 
हा प्रकार आता नित्याचाच झाला असून त्या वाईन शॉप धारकाची कानउघाडणी करून दारूड्यांना वठणीवर आणावे, अशी मागणी आहे.