मान्सून हंगामात ९२ टक्के पेक्षा कमी पर्जन्यमान होण्याची शक्यता
आपत्कालीन व्यवस्था सज्ज ठेवण्याचे निर्देश
अल निनोचा नैऋत्य मोसमी वार्यावर परिणाम
सिंचन प्रकल्पामध्ये ४३ टक्के जलसाठा
नागपूर,
El Niño:Monsoon यंदा अल निनोच्या प्रभावामुळे मान्सून हंगामात ९२ टक्क्यांपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच पाऊस कमी पण धोका जास्त? असे असले तरी, विभागातील अतिवृष्टी संभाव्य पूर परिस्थितीमुळे होणारी जीवित वित्तहानी रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर आपत्कालीन व्यवस्था पूर्णपणे सज्ज ठेवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजया लक्ष्मी बिदरी यांनी दिले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित मान्सूनपूर्व उपाययोजनांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. विभागातील वैनगंगा, कन्हान आणि पेंच नदी खोरे पुरासाठी अत्यंत संवेदनशील आहेत. चोराई प्रकल्पातून पाणी वैनगंगा नदीवरील प्रकल्पापर्यंत पोहोचण्यासाठी ३९ जास्त कालावधी लागतो. त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांना वेळेत सतर्क करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना बिदरी यांनी दिल्या. तसेच आंतरराज्य प्रकल्पांसंदर्भात समन्वय ठेवण्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकार्याची नियुक्ती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
विशेष म्हणजे नागरिकांना अतिवृष्टी व पुरा संदर्भातील अलर्ट वेळेत मिळण्यासाठी नियंत्रण कक्ष तास सुरू ठेवण्यात यावेत. आपत्ती संदर्भात माहिती विभागात ’चॅटबॉट’ सुरू करण्यात आले आहेत. सर्व जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनांतर्गत आपापल्या भागात चॅटबॉट सुरू करावेत, जेणेकरून संपर्क यंत्रणा अधिक गतिमान होईल, असेही निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीला नागपूर महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन इटणकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी विनायक महामुनी, पुनर्वसन सह आयुक्त विजया बनकर, हवामान बालसुब्रमणियम, कर्नल रविकांत (गुजरात व महाराष्ट्र एरिया), एन.डी.आर.एफ. (छॄठऋ) आणि एस.डी.आर.एफ. (डॄठऋ) चे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. तर विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंपदा, ग्रामविकास, कृषी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.
संवेदनशील गावांचा आढावा व सुविधा
अतिवृष्टी व पुरामुळे ज्या गावातील नागरिकांचे स्थलांतर करावे अशा गावांचा मागील ३ वर्षांचा आढावा घेऊन संवेदनशील क्षेत्रे निश्चित करावीत. या क्षेत्रांतील गर्भवती महिला व इतर महिलांच्या आरोग्याची माहिती घेऊन त्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्याचे नियोजन करावे. पूरग्रस्त गावांमध्ये पुरेसे औषध, अन्नधान्य, सर्पदंशावरील औषधे आणि सर्पमित्रांची यंत्रणा तयार निर्देश त्यांनी दिले.
३१ ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठा व पावसाच्या खंडाचे
El Niño:Monsoon नागपूर विभागातील सिंचन प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी ४३ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. पिण्याचे पाणी, औद्योगिक वापर आणि खरीप हंगामासाठी ३१ ऑगस्टपर्यंत हा साठा पुरेसा आहे. मात्र, यंदा काही भागांत पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता असल्याने, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन टंचाईग्रस्त भागांना पाणी पुरवण्याचे निर्देशही विभागीय आयुक्तांनी दिले. हवामान विभागानुसार विदर्भात ते १५ जून दरम्यान मान्सूनचे आगमन होणार असून गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद होणार आहे.
धोकादायक स्थळांवर सुरक्षा उपाययोजना
१. विभागातील सिंचन प्रकल्प तसेच नद्यांवरील धोकादायक स्थळांची तातडीने माहिती घेऊन त्या ठिकाणी माहिती फलक यावेत. अशा ठिकाणी वारंवार दुर्घटना होणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना करून मनुष्यहानी खबरदारी घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.
२. केंद्रीय जल आयोगाकडून १ जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत विभागात निर्माण होणारी पूरस्थिती तसेच धोकादायक पातळी संदर्भात पूर्ण नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार आहे. या कक्षातर्फे दररोज बुलेटिन स्थिती अहवाल जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व संबंधित अधिकार्यांना नियमित दिला जाईल.
नागपूर शहरातील नैसर्गिक आपत्ती उपाययोजनांर्गत नाग नदी, पिवळी नदी, पोरा नदी तसेच शहरातील २२७ नाल्यांची तपासणी करण्यात आली आहे. सध्या गाळ काढण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात आले असून, पुराच्या पाण्याला कुठेही अडथळा निर्माण होणार नाही, यादृष्टीने केले आहे.
४.अतिवृष्टीच्या काळात शहरातील खोलगट भागात ड्रोनचा वापर करून लक्ष ठेवण्यात येईल, अशी महापालिका आयुक्त डॉ. बिपिन इटनकर यांनी दिली.