झुडपी जंगलातील अतिक्रमण धारकांना न्याय मिळवून देणार : आ. अग्रवाल

    दिनांक :15-May-2026
Total Views |
- वनविभागाकडे प्रस्ताव सादर करण्याचे संबंधितांना निर्देश

गोंदिया, 
Encroachment in Forest Areas गोंदिया शहर तसेच ग्रामीण भागातील वनविभागाच्या झुडपी जंगल क्षेत्रात १९९६ पूर्वीपासून वास्तव्यास असलेल्या अतिक्रमणधारकांना कायमस्वरूपी जमीन मालकी हक्क मिळावेत यासाठी आ. विनोद अग्रवाल यांनी प्रयत्नांना वेग दिला आहे. यापूर्वी शासनाच्या जागेवर राहणार्‍या सुमारे ४ हजार २०० हून अधिक ग्रामीण नागरिकांना महसूल मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते कायमस्वरूपी पट्टे देण्याचा उपक्रम आ. अग्रवाल यांच्या संकल्पातून यशस्वी करण्यात आला असताना आता झुडपी जंगल क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या सुमारे १० हजार शहरी व ग्रामीण अतिक्रमणधारकांना न्याय मिळवून देण्याच्या निर्धाराने त्यांनी अधिकार्‍यांना तात्काळ माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहेत.
 
 
ag
 
Encroachment in Forest Areas आ. अग्रवाल यांनी एसडीओ, तहसीलदार, पंचायत समितीचे बीडीओ, नगरपरिषदचे सीओ, तलाठी व ग्रामसेवकांना शहरी तसेच ग्रामीण भागातील झुडपी जंगलाच्या जागेवर १९९६ पूर्वीपासून राहत असलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून प्रस्ताव तत्काळ वनविभागाकडे सादर करण्याचे निर्देश दिले असून १९९६ पूर्वीचे सर्व अतिक्रमणधारक नियमबद्ध करण्यासाठी अतिशय लवकर कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. १९९६ पूर्वीच्या झुडपी जंगल जमिनीवरील अतिक्रमणधारकांना न्याय मिळवून देणे हेच माझे ध्येय आहे. एकही व्यक्ती जमीन हक्कांपासून वंचित राहू नये, हा आपला प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.