चार लाख, ९६ हजार बेशिस्त प्रवासी पकडले
नागपूर,
मध्य रेल्वेच्या मुख्यालयासह सहा झोनमध्ये अवघ्या ३० दिवसांत अर्थात एप्रिल महिन्यात ४ लाख, ९६ हजार Free passengers बेशिस्त प्रवासी पकडले गेले आहेत. रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. सर्वच स्थानके, सर्वच गाड्या प्रवाशांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. अनेक गाड्यांमध्ये पाय ठेवायला जागा नाही.
त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने काही स्पेशल ट्रेनही वाढविल्या आहेत. मात्र, गर्दी नियंत्रणात यायचे नाव घेत नाही. लाभ उठवत फुकटे प्रवासी बिनधास्त प्रवास करीत असल्याने गेल्या एप्रिल महिन्यात मध्य रेल्वेने मुख्यालयासह राज्यातील सहाही झोनमध्ये तिकिट तपासणी मोहिम राबविली. त्यात तब्बल ४ लाख, ९६ हजार प्रवासी पकडले गेले. यात प्रामुख्याने नागपूर विभाग ५८ हजार प्रवासी आढळून आले.त्याच्याकडून ३.९२ कोटी दंड वसूल करण्यात आला. याशिवाय सर्वाधिक प्रवासी मुंबई तर सर्वाधिक कमी प्रवासी सोलापूर आणि मुंबई मुख्यालयात हाती लागले. त्यांच्याकडून मध्य रेल्वेने ४० कोटी, ८५ लाखांचा दंड वसूल केला.
Free passengers गेल्या वर्षी अर्थात एप्रिल २०२५ मध्ये अशाच प्रकारे ४ लाख, ४ हजार प्रवाशांना पकडण्यात आले होते. त्यांच्याकडून दंडापोटी २५ कोटी, ३ लाख रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली होती. या यावर्षी वसूल करण्यात दंडाची रक्कम ६३ टक्के जास्त आहे.