गडचिरोलीच्या औद्योगिक आणि खनिज विकासाला चालना
गडचिरोली,
Gadchiroli Expressway Approved महाराष्ट्राची पूर्व व पश्चिम सीमा शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने जोडण्यासाठी विदर्भातील 547 किमीच्या चार प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. हे प्रकल्प जलदगतीने व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. यात गडचिरोली गडचिरेाली जिल्ह्यातील द्रुतगती महामार्गाचाही समावेश आहे. नवेगाव मोरे-कोनसरी ते सुरजागड ग्रीन फिल्ड रस्ता या गडचिरोलीच्या औद्योगिक आणि खनिज विकासाला चालना देणार्या प्रकल्पांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, सचिव (बांधकामे) आबासाहेब नागरगोजे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. अपर मुख्य सचिव म्हैसकर यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे प्रकल्पांची माहिती दिली.
Gadchiroli Expressway Approved विदर्भातील विकासात महत्त्वाचे पाऊल ठरणार्या या प्रकल्पांची पुढील कार्यवाही जलदगतीने करून प्रकल्प वेळेत होईल यावर भर द्यावा. नवेगाव मोर ते गडचिरेाली जिल्ह्यातील सुरजागड हा मार्ग खनिज वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. हा मार्ग समृद्धी महामार्गाला जोडण्यात यावा, अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली. मंत्रीमंडळाच्या बैठकीत नागपूर-गोंदिया प्रवेश नियंत्रित द्रुतगती मार्ग, भंडारा, गडचिरोली द्रुतगती मार्ग, नागपूर-चंद्रपूर द्रुतगती मार्ग आणि नवेगाव मोरे- कोनसारी ते सुरजागड ग्रीन फिल्ड रस्ता या प्रवेश नियंत्रित शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग प्रकल्पांना यावेळी मान्यता देण्यात आली. या चारही प्रकल्पांची स्थापत्य किंमत 32478 कोटी व एकूण बांधकाम किंमत 51906.35 कोटी रुपये एवढी आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत या महामार्गांचे काम केले जाणार आहे. हे सर्व प्रकल्प सप्टेंबर 2028 ते डिसेंबर 2028 या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
भंडारा- गडचिरोली द्रुतगती मार्गाची लांबी 94.241 किमी असून
1185.73 हेक्टर आर जमीन भूसंपादन करण्यात येणार आहे. हा महामार्ग भंडारा, गोंदिया, गडचिरोली या तीन जिल्ह्यांना जोडला जाणार आहे. नवेगाव मोरे-कोनसारी ते सुरजागड ग्रीन फिल्ड रस्त्याची लांबी 85.765 किमी असून यासाठी एकूण 289.02 हेक्टर आर. जमीन भूसंपादन करण्यात येणार आहे. हा महामार्ग चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील 4 तालुक्यांना जोडला जाणार आहे.