वर्धा,
gold rises भविष्यातील धोके टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले. त्यात सोने खरेदी करू नका हा विषय सराफा व्यवसायिकांना फटका देणारा बसला. त्यामुळे सराफा व्यवसायिकांमध्ये थोडी नाराजी पसरली आहे. परंतु, येथील ढोमणे ज्वेलर्सने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनालाही संधीचे सोने करण्यासाठी पुढाकार घेतला. सोन्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. दरम्यान, आज १५ रोजी सोन्याचे भाव १ लाख ५७ हजार ५०० झाले आहेत. गेल्या दोन दिवसात सोनं १० हजार रुपयांनी वधारले.

भविष्यात काही गोष्टी लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी सोने खरेदी करू नका, पेट्रोल डिझेलची वाहन वापरण्यासंदर्भातही त्यांनी काही मार्गदर्शक सुचना केल्या आहेत. दरम्यान, सोने खरेदी करू नका असे आवाहन केल्यानंतर सराफा व्यवसायिकांनी नाराजी व्यत केली. सोनं अजून महाग होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, वर्धेतील ढोमणे ज्वेलर्स यांनी सोनं खरेदी करू नकाच्या आवाहनाला संधीत रूपांतर करण्याचा प्रयत्न सुरू केला असुन खरेदीसाठी येणार्या ग्राहकांना सोन्याचे अधिक महत्त्व पटवून देण्याची सप्तपदीच तयार करून शोरूमधील कर्मचार्यांमार्फत ते ग्राहकांना पटवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंदी, युद्ध किंवा बाजार कोसळला तरी सोने बहुतेक वेळा मजबूत राहते. महागाई वाढली किंवा पैशांची किमत कमी होते. पण, सोने तुमच्या पैशांची ताकद टिकवून ठेवते. रुपया कमजोर झाला की सोन्याचे भाव वाढू शकतात. युद्ध, तणाव किंवा आर्थिक संकटात लोकं सोन्याकडे वळतात. सोनं तुमची गुंतवणूक संतुलित ठेवते. गरज पडल्यास सोने कधीही विकता येते. मंदीमध्ये संपत्ती वाचवते, महागाईत पैशांची किंमत टिकवते अशी माहिती ग्राहकांना देऊन संधीचे सोने करून ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती एमटीडी ज्वेलर्सचे संचालक अमोल ढोमणे यांनी दिली.