मनाली- दिल्ली बसचा भीषण अपघात; १५ प्रवासी जखमी

    दिनांक :15-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
manali delhi bus accident हिमाचल प्रदेशातील मनालीहून दिल्लीकडे जाणाऱ्या खाजगी बसचा शुक्रवारी पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात सुमारे १५ प्रवासी जखमी झाले असून एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे, ज्याचा हात तुटल्याची माहिती समोर आली आहे.

manali delhi bus accident 
 
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास लाईट पॉईंटजवळ बसचालकाने एका ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. याच वेळी बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आणि बस रस्त्यावर आदळली. अपघाताची माहिती मिळताच रस्ते सुरक्षा दल आणि स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने बसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढून जखमींना तातडीने डेराबासी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.manali delhi bus accident काही वेळ घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. गंभीर जखमी प्रवाशाला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी डेराबासी सिव्हिल हॉस्पिटलमधील पीजीआयमध्ये हलवण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.