रात्रीच्या अंधारात अवैध रेती वाहतूक सुरूच

हदगावमध्ये नियमबाह्य रेती पुरवठ्याला ऊत

    दिनांक :15-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
हदगाव,
illegal-sand-transportation : शहर व परिसरात सध्या विविध बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यासाठी लागणाèया रेतीचा पुरवठा मात्र अनेक ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने होत असल्याचे चित्र आहे. विशेषतः रात्री उशीरा तसेच शासकीय सुट्टीच्या दिवशी अवैध रेती वाहतूक व पुरवठा सुरू असल्याने महसूल व पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 

ytl 
 
सौजन्य: AI फोटो 
 
 
हदगाव शहरात रेती पुरवठ्याचे एक संघटित जाळे सक्रिय असून त्यामागे राजकीय पाठबळही असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. या टोळीमार्फत रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांच्या सहायाने मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक केली जात असल्याचे सांगितले जाते.
 
 
अनेकदा नियमांचे उल्लंघन करून नदीपात्रातून रेती उपसा केला जात असून संबंधित विभागाकडून प्रभावी कारवाई होत नसल्याची तक्रार आहे. महसूल अथवा पोलिस प्रशासनाकडून एखादे वाहन पकडण्यात आले तरी त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होतो. त्यामुळे अवैध रेती व्यवसायींचे मनोबल वाढत असून कारवाईची भीतीच उरलेली नसल्याचे चित्र आहे.
 
 
हदगावकर नागरिकांनी प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन अवैध रेती वाहतूक थांबवावी, अशी मागणी केली आहे. तसेच नदीपात्रांचे होणारे नुकसान, पर्यावरणीय हानी आणि शासनाचा होणारा महसुली तोटा लक्षात घेता संबंधित अवैध वाळू तस्करांविरोधात कठोर कारवाई करण्याची अपेक्षा आहे.
 
 
आता महसूल विभागाचे पथक आणि पोलिस प्रशासन या अवैध रेती वाहतुकीवर प्रभावी कारवाई करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.