शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्जवाटप सुरू करा : अन्यथा आंदोलन

    दिनांक :15-May-2026
Total Views |
मारेगाव,
crop-loan-distribution : नवीन हंगामासाठी शेतकèयांना पीक कर्जवाटपात दिरंगाई होत आहे. शेतकèयांना बियाणे तसेच रासायनिक खते आणि इतर शेती कामासाठी शेतकèयांना पीक कर्जवाटप त्वरित सुरू करावे. अन्यथा याविरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेसचे जिल्हा महासचिव मारोती गौरकार यांनी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मारेगाव शाखा व्यवस्थापकाला निवेदनातून दिला आहे. मारेगाव हा आदिवासीबहुल तालुका असून आत्महत्याग्रस्त तालुका म्हणून ओळख आहे. त्यामुळे शेतकèयांची अवस्था फार बिकट आहे. त्यातच या बँकेचे अधिकारी बुद्धीपुरस्सर टाळाटाळ करुन संस्थांचे तक्ते तपासण्यात वेळ वाया घालवतात. त्यामुळे वाटपास जून महिना येतो. मारेगाव शाखेचे निरीक्षक यांना विचारणा केली असता उद्धट बोलून शेतकèयांची अवहेलना करतात. या सर्व बाबी लक्षात घेता येत्या 2 दिवसांत वाटप करण्यात यावे, अन्यथा उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा मारोती गौरकार यांनी दिला आहे.
 
 
 
ko;p