गोंदियाच्या युवक-युवतींना इस्राईलमध्ये नोकरीची संधी

    दिनांक :15-May-2026
Total Views |
- होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स या पदासाठी जागा उपलब्ध :अर्ज करण्याचे आवाहन
गोंदिया, 
Job Opportunities in Israel  महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत गोंदिया जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी इस्राईल देशात नोकरीची मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना शासनाच्या. महाराष्ट्र इंटरनॅशनल पोर्टल या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. इस्राईलमध्ये होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स या पदासाठी सुमारे ५ हजार जागा उपलब्ध असून, निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा सुमारे दीड लाख रुपयांपर्यंत वेतन मिळू शकते. या पदांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांचे वय २५ ते ४५ वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणे गरजेचे आहे.
 
 

job  
 (संग्रहित छायाचित्र )
 
Job Opportunities in Israel उमेदवारांकडे घरगुती आरोग्य सेवा किंवा काळजीवाहू सेवेसंबंधी भारत सरकार मान्यताप्राप्त संस्थेचे किमान ९९० तासांचे प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. याशिवाय नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट किंवा मिडवायफरी संबंधित प्रशिक्षण घेतलेले उमेदवारही पात्र राहतील. तसेच जीडीए, एएनएम, जीएनएम, बीएससी नर्सिंग किंवा पोस्ट बीएससी नर्सिंग अशी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनाही अर्ज करता येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र युवक-युवतींनी या रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदियाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.