आ. वानखेडे यांचा विकास कामांचा धडाका; २ कोटी ७९ लाखाच्या विकास कामांचा शुभारंभ

    दिनांक :15-May-2026
Total Views |
जलसंधारण आणि रस्ते विकासातून शेतकर्‍यांची समृद्धी
 
आर्वी, 
आर्वी विधानसभा मतदार संघ विकासाच्या बाबतीत कुठेच मागे राहता कामा नये यासाठी MLA Sumit Wankhede आ. सुमित वानखेडे सातत्याने प्रयत्नशील असतात. आपल्या कौशल्याचा पुरेपुर वापर करीत प्रत्येक क्षेत्रातील कामं पुर्णत्वास नेण्याचा मानस आ. वानखेडे यांचा आहे. ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकर्‍याला सक्षम करण्यासाठी आ. वानखेडे यांनी कंबर कसली असून गाळमुत तलाव व गाळयुत शिवार अभियानांतर्गत कारंजा तालुयात २ कोटी ७९ लाखांच्या विकास कामांचा शुभारंभ आज १५ रोजी आ. सुमीत वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आला.
 
 
wankhede
 
MLA Sumit Wankhede  आ. वानखेडे यांनी तालुयातील जलसंधारण आणि रस्ते विकासासाठी तब्बल २ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी खेचून आणला आहे. या अभियानांतर्गत माळेगाव (काळी), आजनादेवी, बेलगाव आणि आजनडोह येथे लघु सिंचन तलाव खोलीकरणाची कामे, तर गवंडी, मोर्शी आणि बांगडापूर येथे गाव तलाव खोलीकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहेत. राहटी व सुसुंद येथे पाझर तलाव खोलीकरण आणि सेलगाव (ल.) येथे कार नदी प्रकल्पातील गाळ उपसा कामांचे भूमिपूजनही करण्यात आले. या तलावांमधील सुपीक गाळ शेतकर्‍यांच्या शेतात पोहोचणार असल्याने जमिनीचा पोत सुधारेल आणि रासायनिक खतांच्या खर्चात मोठी बचत होऊन उत्पादन वाढेल असा विश्वास आ. वानखेडे यांनी व्यत केला. जलसंधारणासोबतच कारंजा-धावडी रस्ता, खरसखांडा-हेटीकुंडी रस्ता आणि काजळी-राहटी रस्ता सुधारणा ही महत्त्वपूर्ण कामे मार्गी लावली आहेत. शेतीला पाणी मिळावे यासाठी आ. वानखेडे सतत कार्यमग्न आहेत.
 
 
या विविध कामांच्या शुभारंभ प्रसंगी कारंजा, माळेगाव (काळी), आजनादेवी, बेलगाव, सेलगाव (ल.), कारंजा, धावडी, गवंडी, मोर्शी, खरसखांडा, हेटीकुंडी, आजनडोह, बांगडापूर, काजळी, राहटी आणि सुसुंद येथील सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह परीसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.