पुलगावच्या आयुध निर्माणीत चुकीने गोळी सुटून सुभेदाराचा मृत्यू

    दिनांक :15-May-2026
Total Views |
पुलगाव,
accidental-firing : येथील केंद्रीय आयुध निर्माणीत नियमित फायरिंग सरावादरम्यान डिफेन्स बंदुकीतून चुकीने गोळी सुटल्याने सियुरिटी कोर (डीएससी)चे ज्युनिअर कमिशण्ड ऑफिसर सुभेदार मेजर ओम बहादुर खंड यांचा मृत्यू झाला. ही घटना आज १५ रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
 
 
k
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी फायरिंग रेंजवर नियमित सराव सुरू असताना चुकीने बंदुकीतून गोळी सुटून ती सुभेदार मेजर ओम बहादुर खंड यांना लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
 
 
या प्रकरणी नागपूर संरक्षण जनसंपर्क विभागाचे ग्रुप कॅप्टन आर. कन्नन यांनी या घटनेला दुजोरा दिला. या घटनेची चौकशी सुरू करण्यात आल्याचे सांगितले. सुभेदार मेजर ओम बहादुर खंड यांचा मृतदेह वर्धेतील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. शनिवारी शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, वर्धा येथील पोलिस अधिकारीही पुलगाव येथे तपासासाठी पोहोचले आहेत. या प्रकरणी पुलगाव पोलिसात वृत्त लिहिस्तोवर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रीया सुरू असल्याने घटनेविषयी सवित्तर माहिती मिळू शकली नाही.