रेल्वे कर्मचार्‍यांनी अन्यायाविरुद्ध लढा दिलाच पाहिजे

    दिनांक :15-May-2026
Total Views |
शिव गोपाल मिश्रा यांचे आवाहन
 
नागपूर,
Railway Loco Pilot रेल्वेच्या सर्व लोकोपायलट कर्मचार्‍यांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सज्ज असले पाहिजे, असे आवाहन ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे महासचिव शिव गोपाल मिश्रा यांनी शुक्रवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह येथे नॅशनल रेल्वे मजदूर वतीने आयोजित रेल्वे परिषदेत केले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे (एआयआरएफ) कार्यकारी अध्यक्ष जे.आर. भोसले, वेणू पी नायर, मोहनीश बॅनर्जी, मदन परिहार, जी. एस. गणेशन, अमर सिंग आणि इतर युनियन नेते व्यासपीठावर उपस्थित होते.

railway-parishad 
 
या परिषदेत देशभरातील लोको पायलट, असिस्टंट लोको पायलट, गार्ड आणि ट्रेन मॅनेजर यांच्यासह हजारावर सहभागी झाले होते.
लोको पायलट, असिस्टंट लोको पायलट, गार्ड आणि ट्रेन मॅनेजर आदी कर्मचार्‍यांच्या कामाचे तास, कामाची परिस्थिती, पदोन्नती, कर आकारणी आणि कल्याणासंबंधी अनेक ठराव मंजूर करण्यात आले. साइन-ऑन ते साइन-ऑफ पर्यंतचा एकूण कामाचा कालावधी जास्तीत जास्त नऊ तासांपर्यंत मर्यादित ठेवण्यात यावा. तसेच प्रत्यक्ष कार्यरत ड्युटी साधारणपणे आठ तासांपर्यंत असावी. विश्रांती, कॉल नोटीस कालावधी वगळून १६ तासांची विश्रांती आणि सततच्या रात्रीच्या ड्युटीवर निर्बंध घालण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
 
 
संपूर्ण देशभरात कर्मचार्‍यांची कमतरता आणि वाढत्या कामाच्या दबावावर गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. रेल्वेच्या विविध श्रेणींमधील रिक्त जागा प्राधान्याने भरण्यासह मनुष्यबळ तैनातीचा वार्षिक आढावा घेण्याची मागणी केली. रेल्वे सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर, कर्मचार्‍यांना वैयक्तिकरित्या फॉग सेफ डिव्हाइसेस बाळगण्यास भाग पाडण्याऐवजी, सर्व लोकोमोटिव्ह कॅबमध्ये ती बसवण्याचे आवाहन केले. तसेच, लोकोमोटिव्ह कॅबमध्ये डेटोनेटर्स, झेंडे आणि इतर आवश्यक सुरक्षा उपकरणे कायमस्वरूपी उपलब्ध असावीत, अशी मागणी करण्यात आली.
 
 
प्रतिनिधींनी Railway Loco Pilot  लोको पायलट आणि सहाय्यक लोको पायलट यांच्यावरील शिस्तभंगाच्या कारवाईत अधिक संतुलित आणि मानवतावादी दृष्टिकोन ठेवण्याची मागणी किरकोळ किंवा अपघात नसलेल्या प्रकरणांमध्ये सक्तीची सेवानिवृत्ती किंवा सेवेतून काढून टाकण्यासारखी कठोर शिक्षा होऊ नये, असा युक्तिवाद त्यांनी केला. एकाच चुकीनंतर कर्तव्यावरून कायमचे काढून टाकण्याऐवजी, त्यांना पुनर्प्रशिक्षण आणि पुनर्मूल्यांकनाची संधी मिळावी, अशी मागणीही शिव गोपाल मिश्रा यांनी केली. एआयआरएफच्या नेत्यांनी रेल्वे प्रशासन आणि केंद्र सुरक्षा, परिचालन कार्यक्षमता आणि कर्मचारी हितासाठी या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आवाहन केले.