रुपयाची विक्रमी घसरण!

इतिहासात पहिल्यांदाच गाठली नीचांकी पातळी

    दिनांक :15-May-2026
Total Views |
नवी दिल्ली
rupee-hits-record-low : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी आजचा दिवस अत्यंत चिंतेचा ठरला आहे. परकीय चलन बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली असून, भारतीय रुपयाने इतिहासातील सर्वात नीचांकी पातळी गाठली आहे. पहिल्यांदाच एका अमेरिकन डॉलरची किंमत 96 रुपयांच्या पार गेली आहे. पश्चिम आशियातील वाढता भू-राजकीय तणाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ, या दोन मुख्य कारणांमुळे रुपयाला हा मोठा धक्का बसला आहे. बाजार उघडताच सुरू झालेल्या या घसरणीमुळे गुंतवणूकदारांसह सर्वसामान्यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
 
 
rupee
 
खाद्यवस्तू आणि डाळी महागण्याची शक्यता
 
 
रुपयाचे मूल्य घटल्याचा थेट फटका तुमच्या स्वयंपाकघराला बसणार आहे. भारत आपल्या गरजेची मोठी डाळ आणि खाद्यतेले (विशेषतः पाम तेल) परदेशातून आयात करतो. रुपया कमकुवत झाल्यामुळे या वस्तूंच्या आयातीसाठी आता अधिक डॉलर्स मोजावे लागणार आहेत. परिणामी, येत्या काही दिवसांत डाळी आणि शुद्ध खाद्यतेलांच्या किमतीत मोठी वाढ होऊन सामान्य माणसाचे बजेट कोलमडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.