नागपूर,
heatwave-nagpur : उष्ण लाटेचा इशारा दिल्यानंतर शुक्रवारी नागपूरचा पारा ४५ अंशांवर आला. सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवत असल्याने घराबाहेर फिरणार्यांना दुप्पटा, रुमाल, टोपी, काळा चष्मा कार्यालयात जावे लागले. हवामान विभागाने नागपूर जिल्ह्यात संभाव्य उष्णता लाटेच्या ( हीट वेव्ह ) येलो अलर्ट जाहीर केला होता. तसेच या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, कामगार व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी होते. पुढील दोन दिवस सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
विशेष काळजी घेण्याचे आवाहन
मुख्यत: महिन्यात उच्चांकी तापमान व उन्हाचे चटके सोसल्यानंतर मे महिन्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून उष्णतेच्या लाटेची तीव्रता कायम राहणार आहे.
हवामान विभागाच्या हीट वेव्ह संदर्भात इशारा दिल्यानंतर नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. सकाळी अकरा ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत नागरिकांच्या संरक्षणासाठी कार्यक्रम आयोजित करु नये तसेच विद्यार्थी, कामगार व नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने सर्व आस्थापना व महाविद्यालयांनी आवश्यक उपाययोजना कराव्या असे सक्त निर्देश देण्यात आले.
पुन्हा उन्हाचे जोरदार चटके बसणार
सर्वाधिक उन्हाच्या मे महिन्याच्या पूर्वार्धात अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे ऊन व अनपेक्षितरित्या उकाड्यापासून दिलासा मिळाला. मात्र उत्तरार्धात उन्हाचे जोरदार चटके आहेत. उष्णलाटेसाठी सध्या अनुकूल वातावरण असल्यामुळे या आठवड्यात पारा ४५ अंशाच्यावर राहण्याची शक्यता आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास काही भागात तुरळक पावसाने हजेरी लावल्यानंतर कडक ऊन तापले. तुरळक पाऊस व ढगाळ वातावरणाचा खेळ रंगला. मात्र उष्णतेच्या झळा कायम होत्या.
उष्ण वारे वाहू लागल्याने कडक ऊन तापणार
नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांतील तापमान अचानक ४५ अंशाच्या जवळपास पोहोचले आहे. वेस्टर्न डिस्टर्वन्स’चा प्रभाव हळूहळू कमी होत असल्याने पुन्हा उष्ण वारे वाहू लागल्याने कडक ऊन तापणार आहे. त्यामुळे आगामी काळात उष्ण लाट अपेक्षित आहे.विदर्भातील तापमानात पाच ते सहा अंशांपर्यंत वाढ अपेक्षित असून परिणामतः पारा पुन्हा ४५ अंशांच्या वर जाण्याची दाट शक्यता आहे. तसा अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
सायंकाळनंतर उष्णतेच्या झळा
अपेक्षेप्रमाणे शुक्रवारी नागपूरसह संपूर्ण विदर्भात उष्णलाटेचा तीव्र प्रभाव दिसून आला. सर्वत्र तापमानात मोठी वाढ झाली असून सर्वाधिक ४५.६ अंश सेल्सिअसची नोंद अमरावती तर अकोला येथे ४५.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली. नागपूरचा पारा वाढल्याने सायंकाळनंतर उष्णतेच्या झळा सहण कराव्या लागल्या. गेल्या नागपुरात सहावेळा तापमान ४५ किंवा त्यापेक्षा अधिक नोंदले गेले. आजवरचा इतिहास बघितल्यास २३ मे २०१३ हा दिवस नागपूरकरांसाठी अग्निपरीक्षेचा राहिलेला आहे. या दिवशी कमाल तापमान विक्रमी ४७.९ अंशांवर झेपावले होते. याशिवाय अवकाळी पावसाने मे महिन्यात बर्याचवेळा धिंगाणा घातलेला आहे.