स्वगणनेत फक्त ६४४५ जणांनी नोंदवली माहिती

    दिनांक :15-May-2026
Total Views |
आजपासून जनगणनेचा दुसरा टप्पा
वर्धा, 
Self-Enumeration शासनाच्या वतीने जनगणेनचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यात पहिला टप्पा १ मे १५ मेपर्यंत स्वगणनेचा कार्यक्रम सुरू करणात आला. प्रथमच जनगणनेत नागरिकांना गणनेच्या माध्यमातून सहभागी होण्याची संधी मिळाली. या कालावधीत १४ मेपर्यंत जिल्ह्यात फत ६४४५ जणांनी स्वगणना केली.
 
 
Enumeration
 
देशातील ही पहिली डिजीटल जनगणना आहे. पहिल्या टप्प्यात घरयादी व गणना तर दुसर्‍या टप्यात लोकसंख्या गणना केली जाणार आहे. जनगणनेच्या सुलभीकरणासाठी सुरुवातीला १ ते १५ मे दरम्यान, स्वगणना करण्यात येत आहे. यामध्ये मोबाईलच्या माध्यमातून प्रत्येक व्यतीला स्वतः माहिती भरायची आहे. स्वगणनेच्या माध्यमातून नागरिकांना प्रथमच जनगणनेच्या कामात सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये स्वगणना सुरू झाल्यापासून ६४४५ लोकांनी स्वगणनेत सहभाग होत माहिती अपलोड केली आहे.
 
 
Self-Enumeration  १६ मे ते १७ जून या कालावधीत दुसरा टप्पा सुरु होणार आहे. यावेळी प्रगणक घरभेटीला आल्यानंतर आपल्या आयडीद्वारे संपूर्ण माहिती तपासणार आहे. ही जनगणना पूर्णतः डिजिटल स्वरुपाची राहणार आहे. माहिती संकलनासाठी विशेष अप्लिकेशन्चा सापर केला जाणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष कुटुंबाची तसेच घराची सविस्तर माहिती जमा करण्यासाठी अ‍ॅप वापरले जाणार आहे. या अद्ययावत प्रक्रियेद्वारे घराची स्थिती. पिण्याचे पाणी, वीज स्वच्छता आणि मालमत्ता याबद्दल सखोल माहिती घेतली जाणार आहे. या कामाकरिता दहा शहरी जार्च अधिकारी, आठ ग्रामीण चार्ज अधिकारी नियुत करण्यात आले आहेत. सेाबतच २० जिल्हास्तरीय चार्ज अधिकारी, २ मास्टर ट्रेनर, ४२ फिल्ड ट्रेनर, २ हजार २०२ प्रगणक, ३६८ पर्यवेक्षक व २० तांत्रिक सहाय्यक निवडले असून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.