SSC स्टेनोग्राफर भरती २०२६; ७३१ पदांसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी

    दिनांक :15-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
ssc stenographer recruitment कर्मचारी निवड आयोगाने (Staff Selection Commission) जाहीर केलेल्या स्टेनोग्राफर भरती २०२६ साठी अर्ज करण्याची आज अंतिम मुदत आहे. एकूण ७३१ स्टेनोग्राफर पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात असून इच्छुक उमेदवारांनी तत्काळ अर्ज पूर्ण करावा, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
 
 
ssc stenographer recruitment
 
 
 
ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांच्यासाठी आजची तारीख ही शेवटची संधी असून नंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे पात्र उमेदवारांनी तातडीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांच्या अर्जात दुरुस्ती करण्याची संधीही देण्यात आली आहे. अर्ज दुरुस्ती २० आणि २१ मे रोजी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध राहणार आहे.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे. उमेदवारांचे वय १ ऑगस्ट २०२६ या तारखेनुसार निश्चित केले जाणार आहे.
शैक्षणिक पात्रतेनुसार, उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून इयत्ता १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी आणि प्रथम वन-टाइम रजिस्ट्रेशन पूर्ण करावे. त्यानंतर स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी परीक्षेची लिंक निवडून आवश्यक माहिती भरावी. अर्ज शुल्क भरल्यानंतर अर्ज पूर्ण मानला जाईल आणि भविष्यातील वापरासाठी त्याची प्रिंट घेणे आवश्यक आहे.ssc stenographer recruitment अर्ज शुल्काबाबत बोलायचे झाल्यास, सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹100 शुल्क निश्चित करण्यात आले आहे, तर एससी, एसटी आणि महिला उमेदवारांना शुल्कातून सूट देण्यात आली आहे.