शेअर बाजारात जबरदस्त सुरुवात; सेन्सेक्स-निफ्टी तेजीत

    दिनांक :15-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
stock market भारतीय शेअर बाजाराने आठवड्याच्या शेवटच्या दिवशी उत्साहपूर्ण सुरुवात केली असून गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक वातावरण दिसून येत आहे. सकाळच्या सत्रात बीएससी सेन्सेक्स आणि निफ्टी ५० दोन्ही निर्देशांकांनी वाढ नोंदवली. या तेजीमुळे बाजारात गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला असून विविध क्षेत्रांमध्ये खरेदीचा कल दिसून आला आहे.
 
stock market
 
 
सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १००.६५ अंकांनी म्हणजेच ०.१३ टक्क्यांनी वाढून ७५,४९९.३७ वर उघडला, तर निफ्टी ५५.५० अंकांनी म्हणजेच ०.२३ टक्क्यांनी वाढून २३,७४५.१० वर व्यवहार करत होता. मागील सत्रातील घसरणीनंतर बाजारात पुन्हा सुधारणा दिसून आली आहे.
विशेषतः आयटी आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. निफ्टी आयटी निर्देशांकात सुमारे १.५२ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली असून या क्षेत्रातील शेअर्समध्ये सुधारणा झाल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. अलीकडील घसरणीनंतर व्हॅल्यू बायिंगचा कल वाढल्याचे बाजार तज्ज्ञांचे मत आहे.
ऑटो क्षेत्रानेही मजबूत कामगिरी केली असून Nifty Auto निर्देशांक सुमारे १.११ टक्क्यांनी वाढला आहे. वाढत्या मागणीच्या अपेक्षेमुळे या क्षेत्रातील गुंतवणूक आणखी मजबूत होत असल्याचे संकेत मिळत आहेत. तर दुसरीकडे मेटल आणि पीएसयू बँक क्षेत्रात मात्र दबाव दिसून आला आहे.stock market निफ्टी मेटल आणि निफ्टी पीएसयू निर्देशांक घसरणीसह व्यवहार करत होते. जागतिक बाजारातील धातूंच्या किमतीतील चढउतार आणि काही प्रमाणातील नफावसुली यामुळे या क्षेत्रांवर दबाव आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एकूणच बाजारातील सुरुवातीच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला असून परदेशी बाजारांकडून मिळणारे सकारात्मक संकेत आणि निवडक क्षेत्रांतील खरेदीमुळे बाजारात चांगले वातावरण निर्माण झाले आहे.