ते कात्रण ‘तरुण भारत’चे नव्हे!

    दिनांक :15-May-2026
Total Views |

Tarun Bharat

 
तरुण-भारत नागपूरच्या नावाने व्हायरल होत असलेले बातमीचे कात्रण.  
 
नागपूर,
Tarun Bharat's Clarification Regarding the Fake Clipping ‘तरुण भारत’च्या नावाने प्रसारित होत असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बालपणीच्या बातमीचे कात्रण हे प्रत्यक्षात वृत्तपत्राचे अधिकृत कात्रण नसून आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) च्या मदतीने तयार करण्यात आलेले असल्याचे आम्ही स्पष्ट करतो. ‘तरुण भारत’च्या नावाचा वापर करून चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली जात असल्याचे लक्षात आले आहे. अशा प्रकारे नावाचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तींवर आणि घटकांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. ‘तरुण भारत’शी संबंधित अधिकृत बातम्या केवळ त्यांच्या अधिकृत माध्यमांद्वारेच प्रकाशित केल्या जातात. त्यामुळे वाचकांनी सोशल मीडियावर किंवा इतर प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या अशा संशयास्पद कात्रणांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आम्ही करतो.