- आता होणार 200 कोटींची बचत
- नागपूर विमानतळाला असाही लाभ
दिनांक :15-May-2026
Total Views |
अनिल फेकरीकर
नागपूर,
shirkhedkars विमानाने प्रवास करणारे कोट्यवधी प्रवासी आहेत. पण एखादाच प्रवासी जिज्ञासू असतो अन् तो त्यावर संशोधन करून आपल्या देशाला काहीतरी भेट देतो. अशाच स्वरूपाची अनोखी भेट देण्याचा चमत्कार इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्सचे अध्यक्ष डॉ. संदीप शिरखेडकर यांनी करून दाखविला. त्यांनी गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या 11180 विमानांच्या हवेतील फेèया थांबवून सुमारे 200 कोटी रुपयांच्या बचतीचा मार्ग प्रशस्त केला.
नागपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. या विमानतळावर एक धावपट्टी आहे. त्या धावपट्टीचे पहिले टोक जयताळा येथे आहे. त्याला 14 एंड म्हणतात, तर दुसरे टोक वर्धा मार्गाकडे असून, त्याला 32 एंड म्हणतात. दोहा, पुणे, शारजा, नाशिक, दिल्ली, लखनऊ, मुंबई, इंदूर, अहमदाबाद, किशनगड येथून नागपुरात येणाèया विमानांनी फेरा वाचविण्यासाठी जयताळाकडील 14 एंडनेच उतरणे आणि उडणे अपेक्षित होते, तर बंगळुरू, हैदराबाद, गोवा, बेलगावी, कोलकाता येथून येणाèया विमानांनी भौगोलिकदृष्ट्या वर्धा मार्गाकडील 32 एंडनेच उतरणे आणि उडणे अपेक्षित आहे. पण केवळ 32 एंडलाच विमान लॅण्डिंगची स्वयंचलित आयएलएस यंत्रणा असल्याने वैमानिक 14 एंडने उतरणे टाळायचे. परिणामी त्यांना फेरा मारूनच खाली यावे लागायचे. यामुळे हवेत विनाकारण विमानांचा 14 मिनिटांचा फेरा वाढायचा. फेरा वाढल्याने इंधनावर दरवर्षी 70 कोटी रुपये वाया जायचे. शिवाय भांडवलासाठी 30 कोटी, विमान भाडे 6 कोटी रुपये, देखभालीसाठी 39 कोटी, कर्मचाèयांच्या भत्त्यांवर 2 कोटी रुपये, वेळ वाया गेला म्हणून 39 कोटी, प्रदूषणापोटी 15 कोटी रुपये यानुसार वार्षिक 200 कोटींचा चुराडा व्हायचा. नागपुरात आठवड्याला 215 विमाने येतात आणि तेवढेच उडतात. त्यानुसार एका वर्षात 11180 विमानांच्या फेèया होतात. याद्वारे दररोज 10400 प्रवासी प्रवास करतात.shirkhedkars त्यानुसार एका वर्षात 37 लाख 96 हजार प्रवासी याचा लाभ घेतात. वार्षिक आकडेवारी पाहता सुमारे 7488 वेळा एका वर्षात चुकीचे लॅण्डिंग, तर 2860 वेळा चुकीचे टेकऑफ होत असल्याची आकडेवारी डॉ. संदीप शिरखेडकर यांनी समोर आणली. त्याचीच दखल घेत 10 मे 2026 पासून जयताळा 14 एंडने विमान उतरणे आणि टेकऑफ करणे सुरू झाले आहे. हा सर्व चमत्कार डॉ. संदीप शिरखेडकर यांच्यामुळे घडला असल्याने ही बाब सुवर्ण अक्षराने नोंदली जाईल, हे मात्र नक्की.