धक्कादायक...जप्त केलेल्या टिप्परची बॅटरी चोरी

    दिनांक :15-May-2026
Total Views |
- सडक अर्जुनीच्या तहसील कार्यालयातील घटना

सडक अर्जुनी, 
Tipper Battery Theft येथील तहसील कार्यालयाच्या आवारातून खनिज वाहतूक करणार्‍या टिप्परची बॅटरी अज्ञात चोरट्याने लांपास केल्याची धक्कादायक घटना घडली. तहसीलचे मुख्य केंद्रस्थान असलेल्या तहसील कार्यालयातच चोरीची घटना घडल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केला जात असून तहसील कार्यालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
 
 
Battery
 
Tipper Battery Theft  मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सुरेश देवराज कावळे रा. बाम्हणी ता. गोरेगाव यांचा रेती वाहतूक करणारा वाहन क्रमांक एमएच ३५ एजे ६७६७ रेती वाहतूक करताना सडक अर्जुनी तहसील कार्यालय मार्फत जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले होते. सुरेश कावळे यांनी सांगितल्याप्रमाणे सदर वाहन सोडविण्याकरिता १३ मे रोजी तहसील कार्यालयात आपल्या सहकार्‍यांसोबत आले. यावेळी त्यांनी टिप्परजवळ जाऊन पाहणी केली असता त्यातील मोठे दोन बॅटरी अंदाजी किमत ४३ हजार चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत त्यांनी तहसीलदार सडक अर्जुनी यांना माहिती दिली. यावर तहसीलदारांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास सांगितले. सुरेश कावळे यांनी डुग्गीपार पोलिस ठाण्यात अज्ञात चोरांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.