धाराशिव,
pratap-sarnaik : आखाती युद्धाचा परिणाम आता संपूर्ण जगावर होत असलेला पाहायला मिळत आहे. देशाच्या पंतप्रधानांनी देशातील जनतेला इंधनाचा वापर कमी करावा असं आवाहन केलं आहे. त्यानंतर अनेक मंत्र्यांनी वाहनांचा ताफा कमी करण्याचा निर्णय घेतला. मात्र आज आज केंद्र सरकारने लिटरमागे पेट्रोल-डिझेलच्या दरात तीन रुपयांची वाढ केली आहे. सहाजिकच या दरवाढीचा सर्वत्र परिणाम होईल. महागाई अजून भडकणार आहे.
धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ऑनलाइन बैठक घेतली. धाराशिव जिल्ह्यातील सर्व विभागातील अधिकाऱ्यांना बैठकीसाठी मुंबईत बोलवण्याऐवजी ऑनलाइन बैठक घेतली. धाराशिव जिल्ह्यातल्या विविध विषयासंदर्भात ऑनलाईन बैठकीतून आढावा घेतला.
याबद्दल महाराष्ट्राचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ‘पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्याने आम्हाला जास्त फटका बसणार आहे. आम्ही सद्यस्थितीत दरवाढ केलेली नाही. पण भविष्यात दरवाढ करावी लागेल. तोटा सहन करू शकत नाही‘. तसेच ते पुढे म्हणाले की, ‘इलेक्ट्रिक बस साठी चार्जिंग स्टेशन तयार करतोय. आमच्या महामंडळाच्या बसेस चार्जिंग केल्यानंतर खासगी गाड्यांना चार्जिंग लावायला उपलब्ध करून देणार‘.
त्याचप्रमाणे यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबद्दलही भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ‘सर्वसामान्य एसटी कामगारांचा पगार वेळेवर देणार. कोणाचाही पगार थांबवणार नाही. मागील जी काही देणी आहेत ती पण दिली जाणार. या सगळ्यासाठी छावा नावाचे ॲपदेखील सुरू करणार आहे.