यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग प्रकल्पातील सर्वात लांब बोगद्याचे यशस्वी ‘ब्रेक-थ्रू’

    दिनांक :15-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद, 
yavatmal-nanded-railway-project : यवतमाळ नांदेड नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या पॅकेज3बी अंतर्गत 2.740 किमी लांबीच्या बोगद्याचे यशस्वी ‘ब्रेक-थ्रूू’ पूर्ण करण्यात आले असून, हा प्रकल्पासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. या ब्रेक-थ्रू कार्यक्रमाला रेल विकास निगम लिमिटेडचे मुख्य कार्यकारी संचालक अनुराग गुप्ता, रेल्वे विकास निगम लिमिटेडचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक मूर्ती व प्रमुख संचालक दिनेश, सुषी इन्फ्रा अँड मायनिंग लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संकीर्थ रेड्डी आणि उपाविभागीय अधिकारी आशिष बिजवल उपस्थित होते.
 
 
y15May-Bogada
 
या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी सुषी इन्फ्रा अँड मायनिंगच्या कार्याचे कौतुक करत, अल्पावधीत उच्च दर्जाची सुरक्षितता व गुणवत्ता कायम ठेवत बोगद्याचे उत्खनन कार्य पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले. या महत्त्वपूर्ण बोगद्याच्या ब्रेक-थ्रूचे यश हे यवतमाळनांदेड नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी एक ऐतिहासिक व मैलाचा दगड ठरणारे यश मानले जात आहे.