अध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी उईके
यवतमाळ,
आजचे गुणवंत विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे उज्ज्वल भविष्य असल्याचे मत नगर परिषद Adv. Priyadarshani Uike अध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी उईके यांनी व्यक्त केले. त्या यवतमाळ नगर परिषदच्या दहावी आणि बारावी परीक्षेत 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन करणाèया गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात बोलत होत्या.
या कार्यक्रमाचे आयोजन नप अध्यक्ष Adv. Priyadarshani Uike अॅड. प्रियदर्शनी उईके यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेल्या या यशाचा गौरव करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला उपविभागीय महसूल अधिकारी गोपाळ देशपांडे, नगर परिषद उपाध्यक्ष दत्ता कुळकर्णी, गटनेते, नगरसेवक तसेच अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील आयुष्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाèया विद्यार्थ्यांचा सन्मान करून यवतमाळ नगर परिषदने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची आपली परंपरा पुन्हा एकदा जपली. हा सत्कार सोहळा केवळ विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव नसून त्यांच्या पालकांच्या त्यागाचा, शिक्षकांच्या मेहनतीचा आणि विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमांचा सन्मान होता.