नागपूरचे चारही संघ उपांत्य फेरीत

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलिबॉल मुंबई, पुणे, नाशिकचीही आगेकूच

    दिनांक :16-May-2026
Total Views |
बदलापूर
State-Level Volleyball Tournament क्रीडा व युवक सेवा संचालनालय, कुळगाव-बदलापूर नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेत नागपूर, यजमान मुंबई, पुणे व नाशिकने विजयी हॅट्ट्रिकसह उपांत्य फेरीत मजल मारली आहे.
  
vollyball
 
State-Level Volleyball Tournament बदलापूर जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या राज्य व्हॉलिबॉल स्पर्धेला तिसèया दिवशीही मोठा प्रतिसाद लाभला. विद्युत प्रकाशझोतात रंगलेल्या स्पर्धेत 21 वर्षांखालील मुलींच्या गटात मुंबईने सलग तिसरा विजय संपादन केला. शेवटच्या साखळी लढतीत मुंबईने लातूर विभागाचा 25-14, 25-11 गुणांनी पराभव करीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. उपांत्य फेरीत गटात अव्वल ठरलेल्या मुंबईची गाठ नागपूरशी पडणार आहे. या गटातील दुसरी उपांत्य लढत नाशिक विरूध्द पुणे विभागात होईल. गतविजेत्या नाशिक संघानेही 3 सामने जिंकून विजेतेपदाचे दावेदार असल्याचे दाखवून दिले आहे.
 
State-Level Volleyball Tournament 21 वर्षांखालील मुलांच्या गटात गतविजेत्या लातूरने अपेक्षेप्रमाणे मुसंडी मारली आहे. कोल्हापूर, संभाजीनगर पाठोपाठ अमरावतीला लोळवून लातूर गटात अव्वल ठरला. अटीतटीच्या तिसèया साखळी सामन्यात लातूरने अमरावतीचा 25-20, 25-21 गुणांनी पराभव केला. लातूरकडून शेहराज शेख, आफताब कुरेशी, निर्भय देशमुखने आक्रमक खेळ केला. लातूरचा उपांत्य फेरीत नागपूर संघाविरूध्द सामना होईल.
State-Level Volleyball Tournament 18 वर्षांखालील गटातही नागपूरची आगेकूच
मुलांच्या 18 वर्षांखालील गटात नागपूरने मुंबईविरुद्ध तिसèया सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत बाजी मारली. तिसèया साखळी लढतीत पहिला सेट नागपूरने गमवला होता. दुसèया सेटमध्ये तुफानी खेळ करीत विजय खेचून आणला. 24-25, 25-21, 15-10 गुणांनी नागपूरने मुंबईचे उपांत्य फेरीतील स्वप्न धुळीस मिळविले. वत्सल्य किरटकर, कृष्णा तडसे यांच्या स्मॅशेसच्या जोरावर नागपूरने विजयी हॅट्ट्रिक साजरी केली. उपांत्य फेरीत नागपूरची पुणे विरूध्द झुंज होईल.
State-Level Volleyball Tournament मुलीच्या 18 वर्षांखालील गटात पुणे संघाने गटात अव्वल स्थान प्राप्त केले. तिसèया साखळी लढतीत नागपूरचा 25-11, 25-7 गुणांनी धुव्वा उडवित उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पुणे संघातील साक्षी साळुंखे, वैष्णवी अडलिंगे हीने लक्षवेधी खेळ करीत नागपूरला पराभूत केले. गतविजेत्या लातूर संघाने 18 वर्षांखालील मुलींच्या गटात पराभवानंतर तिसरा साखळी सामना जिंकत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत पुणे विरूध्द लातूर अशी लढत रंगणार आहे.