बंगळुरूचे लक्ष्य प्ले-ऑफमध्ये स्थान निश्चित करण्याचे

    दिनांक :16-May-2026
Total Views |
धर्मशाला
IPL 19 व्या इंडियन प्रीमियर लीग हंगामात रविवारी येथील नयनरम्य धरमशाला स्टेडियमवर पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यादरम्यान साखळी सामना खेळला जाणार आहे. या सामन्याच्या माध्यमातून बंगळुरूचे प्ले-ऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्याचे ध्येय आहे. सध्या आयपीएलच्या गुणतालिकेत बंगळुरू 16 गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर पंजाब 13 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
 
rajat shreyas 
IPL या सामन्यात विराट कोहली सर्वात मोठे आकर्षण असेल, कारण गत सामन्यातच शतक झळकावून तो येथे आला आहे. धौलाधार पर्वतरांगेच्या चित्तथरारक पृष्ठभूमीवर, आपल्या अफाट लोकप्रियतेसाठी ओळखल्या जाणाèया विराट कोहलीला फलंदाजी करताना पाहण्यासाठी, दिल्ली आणि पंजाबमधून मोठ्या संख्येने चाहते पर्वतरांगेच्या दिशेने आधीच दाखल झाले आहेत. शहरात उपलब्ध असलेल्या मर्यादित पायाभूत सुविधांवर यामुळे प्रचंड ताण आला आहे.
 
IPL  पंजाब किंग्सची धक्कादायक कामगिरी
गतविजेते आणि संपूर्ण स्पर्धेत सातत्य राखणारा एकमेव संघ असलेले रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा पंजाब किंग्सविरुद्ध विजयाचे प्रबळ दावेदार आहेत. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात सर्वात वर्चस्व गाजवणारा संघ असूनही, सलग पाच सामने गमावल्यामुळे पंजाब किंग्सची कामगिरी सध्या पूर्णपणे खालावली आहे.
IPL गुणतालिकेत सध्या भक्कम स्थितीत असले, तरी पंजाब किंग्सचा हा सहावा पराभव श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील या संघासाठी प्ले-ऑफचे दरवाजे प्रभावीपणे बंद करणारा ठरेल.
IPL  टी-20 क्रिकेटच्या इतिहासात 200 हून अधिक धावांची एकूण धावसंख्या उभारूनही सर्वाधिक सामने (10) गमावण्याचा विक्रम पंजाब किंग्सच्या नावावर जमा झाला आहे.
IPL पंजाब किंग्स गोलंदाजीत
सुधारणा करण्याच्या प्रयत्नात
IPL  झेव्हियर बार्टलेट आणि मार्को जॅनसेनसारखे गोलंदाज संपूर्ण स्पर्धेत महागडे ठरल्यामुळे संघाला आपल्या गोलंदाजीच्या संयोजनात फेरबदल करण्याची गरज आहे. अर्शदीप सिंगने गत सामन्यात किफायतशीर गोलंदाजी करून आपला इकॉनॉमी रेट 10 च्या खाली आणला आहे, तर अझमतुल्ला ओमरझाईने हंगामातील आपल्या पहिल्याच सामन्यात फलंदाजी व गोलंदाजीने त्वरित प्रभाव पाडला. विजयकुमार वैशाक संघाबाहेर आहे आणि कदाचित मधल्या व अखेरच्या षटकांमध्ये आवश्यक नियंत्रण मिळविण्यासाठी संघ पुन्हा त्याच्याकडे वळेल.
IPL एकंदरीत चांगली कामगिरी करणाèया फलंदाजी विभागाने गत काही सामन्यांमध्ये पूर्ण क्षमतेने कामगिरी केलेली नाही, परंतु गोलंदाजीनेच संघाला वारंवार निराश केले आहे.
  
IPL  उद्याचे सामने
रॉयल चॅलेजर्स बंगळुरू वि. पंजाब किंग्स
स्थळ : हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटना स्टेडियम, धर्मशाला
वेळ : दुपारी 3.30 वाजतापासून

IPL दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स
स्थळ : अरुण जेटली स्टेडियम, नवी दिल्ली
वेळ : 7.30 वाजतापासून
थेट प्रसारण : स्टार स्पोर्ट्सवर