हावरापेठेतील बेरोजगार तरुण झाले उद्योजक

    दिनांक :16-May-2026
Total Views |
नागपूर,
Bharatiya Janata Party, Marathi हावरापेठ येथील बेरोजगार तरुणांना PMEGP योजनेतून उद्योगासाठी आर्थिक मदत मिळाल्याने त्यांनी उद्योजकतेकडे यशस्वी वाटचाल सुरू केली आहे. अनिकेत बांगडे यांनी सुरुवातीला छोट्या डेअरी व्यवसायातून काम सुरू केले होते. मात्र मोठ्या उद्योगाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आवश्यक भांडवल नसल्याने अडचणी येत होत्या.
 

kn 
 
 
भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मंगेश मोरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला. Bharatiya Janata Party, Marathi त्यानंतर PMEGP योजनेअंतर्गत अनिकेत बांगडे यांना आर्थिक मदत मंजूर झाली.तसेच समीर मडावी या युवकाला ओला-उबेरसाठी चारचाकी वाहन खरेदीकरिता PMEGP अंतर्गत कर्ज मंजूर करण्यात आले. या उपक्रमासाठी नगरसेवक रितेश गांवडे, रमेश शिंगारे, सचिन कारडकर, गोलू बोरकर आणि मंगेश मोरे यांनी विशेष सहकार्य केले.
सौजन्य: रमेश मेहर,संपर्क मित्र