वर्धा,
Bhimratna Award for Sudhil Bhagat डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी महू येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमात पाली भाषेला जनमाणसात रुजविण्यासाठी केंद्र सरकारकडे सलग ११ वर्षे पाठपुरावा करणारे डॉ. सुधीर भगत यांना मानाचा भीमरत्न पुरस्कार मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यानिमित्त यशोदीप बुद्ध विहार, बोरगाव (आलोडा) येथे डॉ. सुधीर भगत यांचा सत्कार करण्यात आला.
Bhimratna Award for Sudhil Bhagat सत्काराला उत्तर देतांना डॉ. भगत म्हणाले की, महू येथे प्राप्त झालेला भीमरत्न पुरस्कार माझ्या आयुष्यातील अतिशय गौरवाचा क्षण होता. इथल्या सगळ्या नातेवाईकांशी, मित्रांशी, आप्तेष्टांशी, ह्या गावाशी, इथल्या मातीशी माझी नाळ जुळलेली आहे, अशा शब्दांत त्यांनी सत्काराप्रसंगी कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी बुद्धम भरणे, डॉ. महेंद्र पखाले, भगवान भरणे, विलास कांबळे यांनी सुद्धा मनोगत व्यत केले. संचालन आलोक भगत यांनी केले तर आभार मंगेश भगत यांनी मानले.