गांजाची लागवड करणार्‍याला अटक

    दिनांक :16-May-2026
Total Views |
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
 
वर्धा, 
Cannabis Cultivation दारूबंदी जिल्ह्यात दारू फत बंदीलाच आहे. आता गांजासह मॅफेड्रानचाही मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला. आधी गांजाची तस्करी व्हायची. आता विक्री आणि हौस फिटवण्यासाठी चक गांजाची झाडेच लावायला सुरूवात झाली आहे. असाच प्रकार दहेगाव पोलिस ठाण्यांतर्गत येणार्‍या हमदापुरात वॉल कम्पाउंड लगत दोन गांजाची झाडे लावली. माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून आरोपीला अटक केली. ही कारवाई १५ रोजी करण्यात आली.
 
 
ganja
 
Cannabis Cultivation  गस्तीवर असलेल्या पथकाला हमदापूर येथील प्रफुल्ल शंभरकर याने घरी गांजाची दोन झाडे लावल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पथकाने धाड टाकली असता ५ फूट उंचीची गांजाची झाडे आढळून आली. या कारवाईत प्रफुल्ल शंभरकर याला अटक केली असून दोन्ही झाडं मुळासह छाटणी करून जप्त केला. यासोबतच आरोपीविरुद्ध दहेगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, अरविंद येनूरकर, रोशन निंबोळकर, रवी पुरोहित, अभिषेक नाईक आदींनी केली.