बुलढाणा,
CITU Meeting in Buldhana मुंबई येथील आझाद मैदानावर सीटूच्या नेत्रुत्वात निर्णायक ठिय्या आक्रोश आंदोलन दि. १ जून रोजी करण्यात येणार आहे.या आंदोलनाच्या जय्यत तयारीचा आढावा घेण्यासाठी दि. १६ मे रोजी बुलडाणा येथे सीटू जिल्हा कमिटीची विस्तारीत बैठक जिल्हा अध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सीटूच्या राज्य पदाधिकारी व बुलडाणा जिल्हा प्रभारी मंगला ठोंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.या सभेच्या सुरुवातीला सीटूचे जिल्हा अध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकात जिल्ह्यातील कामगारांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती व संघटनात्मक अहवाल थोडयात मांडला.
या विस्तारीत बैठकिला जिल्ह्यातील सीटू संलग्न अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर्स व गटप्रवर्तक, शालेय पोषण आहार कामगार व अर्धवेळ स्त्री परिचारिका वेगवेगळ्या संघटनेचे प्रतिनिधी मिळून एकूण ३५ पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.या बैठकीत ११ प्रतिनिधीनी आपआपल्या तालुयातू मुंबई मोर्चात सहभागी होणार्यांची संख्या व तयारी बाबतची माहिती सांगितली.सरकारच्या कामगार विरोधी धोरणामुळे देशातील सर्वसामान्य संघटीत व कोट्यवधी असंघटीत कामगारांमधे प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.कामगारांचे हक्क आणि अधिकार मोठ्या प्रमाणात हिरावून घेतले जात आहेत.त्यामुळे हा असंतोष व्यक्त करण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातून जवळपास १५०० योजना कर्मचारी या मुंबई आंदोलनात सहभागी होतील यासाठी प्रत्येक योजना कर्मचार्यांनी प्रयत्न करावे असे आवाहन मंगला ठोंबरे यांनी जिल्ह्यातील योजना कर्मचार्यांना केले.त्याद्रुष्टीने प्रवासाचे नियोजन करण्यात यावे. त्यासाठीचे सविस्तर मार्गदर्शन केले.तर आभार शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे राज्य सहसचिव तथा जिल्हा कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर वाघमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
CITU Meeting in Buldhana यावेळी आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेच्या जिल्हा सचिव जयश्री तायडे, कोषाध्यक्ष ललिता बोदडे,प्रज्ञा तायडे,वर्षा बेदरकर,आरती सोनटक्के,शारदा खोडके,विजया ठाकरे, शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या उपाध्यक्ष शोभा काळे,उषा डुकरे,ज्योती आराख,राजू गीरी, उर्मिला जाधव,दिपक बेदरकार उज्वला जाधव,शारदा लिंगायत,शोभा मोतेकर,विजया चापाईतकर,वनिता वराडे,सरला अंभोरे,ज्योती ठेंगा, अर्धवेळ स्त्री परिचारिका संघटनेच्या छाया खंडारे,दिला शिंगणे,रेखा डुकरे इत्यादी सह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.