एक मिरची; व्यवसाय भारी...!

    दिनांक :16-May-2026
Total Views |
दफ्तरी सिड्सचा १६ राज्यात विस्तार
 
प्रफुल्ल व्यास
वर्धा, 
मिरची लागली काय किंवा मिरची झोंबली काय असा साधारण बोली भाषेतील वाय वापरले जातात. पण, मिरची कोणाला लाभी लागेल असे म्हणता येईल का?... पण, वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील Daftari Seeds' दफ्तरी सिड्स या व्यवसायाचा पायाच मिरची ठरली.... आज देशातील १६ राज्यात त्यांचा व्यवसाय विस्तार झाला आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुका हा लोकसंख्येच्या दृष्टीने पिटुकाल तालुका. परंतु, या छोट्या तालुयातून दफ्तरी बंधूंनी सुरू केलेला व्यवसाय राज्यात पसरला आहे. शैलेंद्र दफ्तरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे १८ एक परंपरागत शेती होती. त्यांच्या वडिलांना शेतीत प्रयोग करण्याची आवड होती. त्यांनी १९६५ मध्येही प्रयोग करून शेती केली होती. दरम्यान, शैलेंद्र दफ्तरी यांचे मोठे बंधू रविंद्र बि.ए. सिव्हील इंजिनिअर झाले. त्यांनी बांधकामाचा व्यवसायही सुरू केला. दरम्यान, १९७५ मध्ये मुंबईहून येताना त्यांना रेल्वेत सहप्रवासी भेटला.
 
 
Daftari Seeds
 
Daftari Seeds'  त्याने मिर्चीचे उत्पादन खुप झाल्याचे सांगितले. त्यानंतर रविंद्र यांनी त्याच मिरचीचे बियाणे तयार केले. ते २०० किलो बियाणे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात विकले. त्यात मोठ्या प्रमाणात नफा झाल्याने आणि दफ्तरी बंधू या बियाणे विक्रीच्या व्यवसायत उतरले. त्यानंतर वांगे बियाणे तयार केले. कापसाचे पायाभूत बियाणेही बाजारात आणले. गुजराथ दंगलीच्या वेळी तेथील ठोक विक्रेत्याने बियाणे विक्रीला नकार दिल्यानंतर आम्ही स्वत: गुजरातमध्ये बियाणे विकले असल्याचे शैलेंद्र दफ्तरी यांनी सांगितले. तेव्हापासुन दफ्तरी बियाणे म्हणून आम्ही बाजारात उतरलो. पायाभूत बियाण्यामध्ये संकरीत दफ्तरी २९ हे बियाने संशोधन करून विक्री सुरू केली. रविंद्र आणि शैलेंद्रसोबतच जैनेंद्र यांनीही कृषी विषयात संशोधन सुरू केले. जैनेंद्र यांच्यासोबत झाडं बोलतात, असा अनुभव आल्याचे शैलेंद्र दफ्तरी यांनी सांगितले. १९९४ मध्ये हा व्यवसाय वाढवला. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजराथ, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, तेलंगाना, राजस्थान आदी १६ जिल्ह्यांमध्ये व्यवसाय पसरला आहे. आता कापूस, सोयाबिन, वांगी, धान, तूर, आदी बियाण्यांवर संशोधन करून व्यवसाय वाढवला आहे. या व्यवसायात स्थानिक १०० बेरोगारांना नोकरी दिली आहे. यासोबतच सामाजिक दायित्वही आमच्या कंपनीच्या माध्यमातून जोपासले जाते. गावातील राजकारणात दफ्तरी गटही सक्रीय आहे. बोगस बिण्याने विक्रीवर वचक बसलाच पाहिजे. यासोबतच शेतकर्‍यांनीही शेतीयोग्य पाऊस पडल्याशिवाय पेरणीसाठी घाई करू नये. प्रलोबनालाही शेतकर्‍यांनी बळी पडू नये, असे आवाहन, शैलेंंद्र दफ्तरी यांनी केले.