पश्चिम बंगालमध्ये फाल्टा पंचायतीच्या उपाध्यक्षाला अटक

    दिनांक :16-May-2026
Total Views |
दक्षिण २४ परगणा,
Falata Panchayat Deputy Chairperson Arrested पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतरही राजकीय वातावरण तापलेले असतानाच फाल्टा पंचायतचे उपाध्यक्ष सैदुल खान यांना पोलिसांनी अटक केली आहे. जुन्या प्रकरणाच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली असून, सैदुल खान हे फाल्टा विधानसभा मतदारसंघातील तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांचे निकटवर्तीय मानले जातात.फाल्टा मतदारसंघात निवडणुकीदरम्यान मतदारांना धमकावणे आणि दबाव टाकल्याचे आरोप जहांगीर खान यांच्यावर करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या काही वक्तव्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. विशेषतः आयपीएस अधिकारी अजय पाल शर्मा यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यांनंतर राजकीय वातावरण अधिक तापले.
 
 

cdp
 
 
जहांगीर खान यांनी प्रचारादरम्यान केलेल्या भाषणात सुरक्षा दलांबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांच्या वक्तव्यावरून विरोधकांनी टीका करत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणानंतर पोलिस आणि प्रशासन अधिक सतर्क झाले असून संबंधित प्रकरणांची चौकशी सुरू आहे.दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल दिसून आला आहे. निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाल्याची चर्चा सुरू असताना तृणमूल काँग्रेसला अनेक मतदारसंघांत धक्का बसल्याचे बोलले जात आहे. फाल्टा मतदारसंघात फेरमतदान होणार असल्याने या भागातील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. सैदुल खान यांच्या अटकेमुळे तृणमूल काँग्रेससमोर नवे आव्हान उभे राहिले असून, या प्रकरणाचे पडसाद आगामी राजकीय रणनीतीवरही उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.