पेरणीपूर्व मशागतीत शेतकरी व्यस्त

    दिनांक :16-May-2026
Total Views |
बियाण्यांची उगवण क्षमता तपासा : आवाहन
 
सिंदी (रेल्वे), 
Farmers are busy during the Kharif season. मान्सूनचे आगमन कधी होईल याचा भरवसा नाही. परंतु, शेतजमीन सज्ज असावी याकरिता बळीराजा पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त झाला आहे. बी-बियाण्यात फसगत होऊ नये म्हणून शेतकर्‍यांनी बियाण्यांची उगवण क्षमता तपासून बियाण्यांची निवड करावी, असे आवाहन कृषी सहाय्यकांनी केले आहे.
 
 
kharif
 
यंदा खरिप हंगामात शेतमालांचे उत्पादन वाढेल अशी आशा शेतकर्‍यांना आहे. वेगवेगळे सोयाबीन, कपाशी आणि तूर आदींचे बियाणे विक्रीसाठी सध्या बाजारात आले नाही. मात्र, बियाणे उत्पादक कंपन्यांचे पोस्टर युद्ध सुरू झाल्याचे दिसून येत आहे. खरीप हंगामात शेत सजविण्यासाठी शेतकरी ट्रॅटरच्या सहाय्याने वखरणे, नांगरणी करताना दिसतात. शेतातील काडी कचरा वेचण्यासाठी सकाळपाळीत महिला सक्रिय झाल्या आहेत.
 
 
कापूस आणि सोयाबीन ही खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. या पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी बियाणांची निवड आणि व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. पेरणीपूर्वी बियाणांची उगवण क्षमता तपासणे आवश्यक आहे. कपाशीच्या विविध वाणांच्या जाहिराती करण्यासाठी पोस्टर युद्ध सुरू आहे. त्याशिवाय सोयाबीन बियाणांची माहिती कृषी सहाय्यक व तज्ज्ञ मंडळी शेतकर्‍यांना देत आहे. खरीप हंगामात पिकाची लागवड करताना पाण्याची उपलब्धता, जमिनीचा प्रकार पाहूनच बियाणांची निवड करणे गरजेचे आहे.
 
 
Farmers are busy during the Kharif season.  येत्या खरीप हंगामात शेतकर्‍यांना खते व बियाणे वेळेत मिळावे आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावीत यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. शासनातर्फे मागणीच्या तुलनेत बियाणे जास्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. यंदा एल निनोच्या पृष्ठभूमीवर एकात्मिक व्यवस्थापन जागरूकता आणि उपाययोजना या विषयावर संबंधित विभागाकडून मार्गदर्शनाची गरज आहे.