Farmers' crop loans मुळावा व तिवरंग येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या एकूण 59 शेतकèयांनी 31 मार्चपूर्वी कर्जाची थकबाकी पूर्ण केली असूनही अद्याप पीककर्ज मिळालेले नाही. नियमानुसार एप्रिलअखेर नव्याने कर्जवाटप होणे अपेक्षित असताना, प्रस्ताव प्रक्रिया पूर्ण होऊनही बँकेकडून स्वाक्षèया आणि अंतिम मंजुरी रखडल्याची शेतकèयांची तक्रार आहे. मुळावा येथील 20 आणि तिवरंग येथील 39 शेतकèयांनी सोसायटी व बँकेच्या वारंवार फेèया मारल्या; मात्र कर्ज मंजुरी अद्याप प्रलंबित आहे.
Farmers' crop loans यामुळे ऊस पिकाची देखभाल, पुढील हंगामाची मशागत, तसेच बियाणे-खते खरेदी यांचे नियोजन करताना शेतकèयांना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही शेतकèयांनी बँकेच्या व्यवस्थापक व वसुली अधिकाèयांनी प्रस्तावांवर स्वाक्षरी न केल्यामुळे विलंब होत असल्याचा आरोपही केला आहे. याउलट विशेष बाब म्हणजे मुळावा येथील चार सोसायट्यांपैकी हातला, वानेगाव-पार्डी या दोन सोसायटीतील शेतकèयांना कर्ज वाटप झाले आहे. याबाबत सोसायटी सचिवांकडे चौकशी केली असता, जिल्हाभरात सध्या कर्जवाटप थांबले असल्याचे सांगण्यात आले. मात्र संबंधित 59 शेतकèयांचे प्रस्ताव प्रक्रिया पूर्ण अवस्थेत असून ते बँकेकडे प्रलंबित असल्याची माहिती मिळाली.