तनिष्का वायफाय कार्यालयाचे लाखोंचे नुकसान

    दिनांक :16-May-2026
Total Views |
शॉर्टसर्किटमुळे लागली आग

यवतमाळ, 
Fire breaks out at Tanishka WiFi Airtel office आर्णी मार्गावरील साई सत्यज्योत मंगल कार्यालय परिसरातील तनिष्का वायफाय एअरटेलच्या कार्यालयात आग लागली. दुपारी 2 च्या दरम्यान शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. फिटनेस जिमच्या तिसऱ्या मजल्यावर असलेले या कार्यालयातील आगीने काही मिनिटांतच रौद्ररूप धारण केले. आगीत कार्यालयातील संपूर्ण इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर जळून खाक झालेे.
 
 
aag dksl
 
Fire breaks out at Tanishka WiFi Airtel office तिसऱ्या मजल्यावर आग लागल्याने अग्निशमन दलाला आग विझवताना मोठी कसरत करावी लागली. अग्निशमन दलाचे चार बंब दाखल होऊन शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आहे. सुदैवाने या भीषण आगीत कोणतीही जीवहानी झाली नाही. नगर परिषद अग्निशमन विभागाचे श्रावण चव्हाण, राहुल यादव, प्रमोद तिडके, विपिन रहांगडाले, उमेश बाजोरिया, निखिल पाठक, अनुराग फुरसुले, सागर वाढई, नीलेश बिसेन, रवी चौधरी, राजू इंगळे यांनी प्रयत्न केले.