रिसोड,
fire in archives room येथील पंचायत समितीच्या अभिलेख कक्ष (रेकॉर्ड रूम) ला आग लागल्याची घटना १५ मे रोजी रात्री ८:१५ वाजता च्या दरम्यान घडली. पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी व स्थानिक नागरिकांच्या मदतीने व तसेच नगरपरिषेच्या अग्निशमन दल विभागाने ताबडतोब घटनास्थळी येत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, यामध्ये रेकॉर्डमध्ये ठेवलेली काही दस्तीवेज जळाली असून, वेळीच आगीवर नियंत्रण आणल्याने एक मोठा अनर्थ टाळला.

याबाबत माहिती अशी की १५ मे रोजी रात्री ८.१५ वाजता च्या दरम्यान पंचायत समितीच्या अभिलेख कक्ष (रेकॉर्ड रूम) मधून धुर निघत असल्याची माहिती पंचायत समितीच्या शेजारी राहणार्या नागरिकांनी पंचायत समितीच्या अधिकार्यांना दिली. पंचायत समितीचे अधिकार्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व नगरपरिषद अग्निशमन दल विभागाला याबाबत माहिती देण्यात आली. अग्निशामक दल विभागाने ताबडतोब घटनास्थळी घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. यासाठी पंचायत समिती अधिकारी कर्मचारी व स्थानिक नागरिकांचे सहकार्य ही लाभले. रेकॉर्ड रूम मध्ये ठेवलेली काही दस्तावेज जळाली असून वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने एक मोठा अनर्थ टाळला व अन्य दस्तावेज वाचण्यात यश आले.fire in archives room आग कशी लागली याबाबत माहिती मिळू शकली नाही नसली तरी मात्र शॉर्टसर्किटने आग लागल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये होती.
सदर घटनास्थळी दत्ता ढवणे सहाय्यक प्रशासन अधिकारी, विजय इंगोले शाखा अभियंता, सुरेश नवघरे वरिष्ठ सहाय्यक पंचायत समिती तसेच अग्निशमन विभागाचे चालक ताजेकोद्दीन उर्फ कालुभाई, फायरमॅन संजू पवार, नगरपरिषद कर्मचारी शिवाजी शेलार यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अथक परिश्रम घेतले.