राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्याची निवड

    दिनांक :16-May-2026
Total Views |
देऊळगाव राजा :
Football Tournament येथील राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता आठवीचा विद्यार्थी ओम सुदर्शन चित्ते याची बुलढाणा जिल्हा अंडर-15 संघात राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. Western India Football Association (WIFA) यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे होणार आहे.
 

om 
 
Football Tournament  ओम सुदर्शन चित्ते याने सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि उत्कृष्ट खेळाच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याच्या निवडीमुळे शाळेसह देऊळगाव राजा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष डॉ. रामप्रसाद शेळके, शाळेच्या अध्यक्षा डॉ. मीनलताई शेळके, मुख्याध्यापिका डॉ. प्रियंका देशमुख, प्री-प्रायमरी व प्रायमरीच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा इंगळे, उपमुख्याध्यापक निलेश गवई, संचालक सुजित गुप्ता, क्रीडा शिक्षक वसीम सिद्दिकी, मकरंद वानखेडे, शिक्षकवृंद तसेच पालकांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

“विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत क्रीडा क्षेत्रातही प्रगती करावी, हा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे.”
— डॉ. रामप्रसाद शेळके
अध्यक्ष, राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल, देऊळगाव राजा