केंद्रिय मंत्र्यांसह मुख्यमंत्र्याच्या हस्ते गोंदिया जिल्ह्याचा सन्मान
- प्रधानमंत्री आवास योजनेत राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार
दिनांक :16-May-2026
Total Views |
गोंदिया,
gondia district honored महा आवास अभियान २०२३-२४ अंतर्गत जाहीर झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये गोंदिया जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.विशेष म्हणजे, या योजनेत राज्यात अव्वल येण्याचा बहुमान गोंदिया जिल्ह्याला सलग चौथ्यांदा मिळाले आहे.
दरम्यान, शुक्रवारी १५ मे रोजी सातारा येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात ‘प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण’राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगांनथम एम, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रमिला जाखलेकर यांनी स्विकारला.
ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचे घर मिळवून देणाऱ्या ‘प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण’ अंतर्गत गोंदिया जिल्ह्याने पुन्हा एकदा आपली मोहोर उमटवली असून “प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत गोंदिया जिल्ह्याला सलग चौथ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक मिळणे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि ऐतिहासिक बाब आहे.