पाणी टंचाईची कामे तातडीने पूर्ण करा

    दिनांक :16-May-2026
Total Views |
पालकमंत्री डॉ. भोयर यांनी घेतला आढावा
 
वर्धा, 
उन्हाळ्यात काही ठिकाणी पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शयता असते. तालुकास्तरावर आमदारांच्या सूचनेप्रमाने तयार झालेल्या आराखड्यानुसार टंचाईची कामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देश Guardian Minister Dr. Pankaj Bhoyar पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्ह्यातील पाणी टंचाई सदृश्य परिस्थितीचा आढावा बैठकीत त्यांनी निर्देश दिले. यावेळी आ. राजेश बकाने, जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, उपवनसंरक्षक हरविर सिंह, अतिरित मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर आदी उपस्थित होते.
 
 
Bhoyar
 
तालुकास्तरावर आमदारांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या वतीने तालुयातील पाणी टंचाई सदृश्य परिस्थितीचा आढावा घेण्यात येतो. या आढावा याठिकाणी तालुयातील सर्व सरपंच, ग्रामसेवक व तालुकास्तरीय सर्व यंत्रणा उपस्थित असते. या बैठकीत तालुयातील संभाव्य टंचाईचा आढावा घेऊन टंचाई निवारणाचा आराखडा व कामे प्रस्तावित केली जातात. ही सर्व कामे कालमर्यादेत पुर्ण होणे अपेक्षित असते, असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले.
 
 
Guardian Minister Dr. Pankaj Bhoyar  ग्रामपंचायस्तरावर आणि जिल्हास्तरावर निविदा प्रक्रिया राबवून करण्यात येणारी टंचाई कामे तातडीने पुर्ण होणे अपेक्षित आहे. गटविकास अधिकार्‍यांनी गावनिहाय कामांचा आढावा घेतला पाहिजे. पुढील काही दिवस महत्त्वाचे असल्याने प्रत्येक कामाचा तालुका व जिल्हास्तरावर आढावा घेण्यात यावा. पाणी टंचाई निवारणासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या वतीने २७२ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यापैकी १७९ कामांचे करारनामे करून कामे सुरू करण्यात आली आहे. विभागस्तरावर ६५ निविदा प्रक्रिया करण्यात येत आहे. टंचाई कामांमध्ये पाणी पुरवठा योजनांची दुरुस्ती, तात्पुरती पुरक नळ योजना, सार्वजनिक विहिरींचे खोलीकरण, खाजगी विहिरींचे अधिग्रहन अशा कामांचा समावेश आहे. आराखड्याप्रमाणे मंजूर सर्व कामे याच वर्षात आणि कालमर्यादेत पुर्ण होतील, याची जबाबदारी गटविकास अधिकारी यांची राहणार असल्याचे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी टंचाई आराखडा तसेच कामांची माहिती दिली.