खरीप हंगामात खत, बियाणे पुरवठ्याचे सुक्ष्म नियोजन करा

    दिनांक :16-May-2026
Total Views |
पालकमंत्री संजय राठोड यांचे निर्देश
जिल्ह्यात 9.15 लाख हेक्टरवर खरिपाचे नियोजन
 
यवतमाळ, 
जिल्ह्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना खत, बियाणे, औषधी पुरवठ्यात अडचणी येणार नाहीत यासाठी जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन करावे, निर्देश Guardian Minister Sanjay Rathod पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. जिल्हा नियोजन सभागृहात खरीप हंगामपूर्व नियोजन जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार बाळासाहेब मांगुळकर, आ. राजू तोडसाम, आ. किसन वानखेडे, आ. संजय देरकर, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, कृषी विज्ञान केंद्राचे दीपक कच्छवे व विविध विभाग प्रमुख आणि सर्व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.
 
 
Sanjay Rathod
 
Guardian Minister Sanjay Rathod  संजय राठोड पुढे म्हणाले, खरीप हंगामाच्या पृष्ठभूमीवर शेतकऱ्यांना पीक कर्जवाटप पूर्ण करावे. दर्जेदार खते, बियाणे, औषधी उपलब्धतेसाठी नियोजन करावे. जिल्ह्यात खत, बी-बियाण्यांचा तुटवडा जाणवणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच त्यांचा काळाबाजार करणाऱ्यांवर धडक कारवाई करावी. शेतकèयांसाठी टोल फ्री क्रमांक कार्यान्वित ठेवावा. फळबाग व भाजीपाला लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करावे. पशुधनासाठी वैरण विकासाचा धडक कार्यक्रम राबवावा. वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा प्रचार प्रसार करावा, शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ द्यावा. या बैठकीत खा. प्रतिभा धानोरकर, आ. बाळासाहेब मांगुळकर, आ. राजू तोडसाम, आ. किसन वानखेडे, आ. संजय देरकर यांनीही महत्त्वपूर्ण सूचना केल्या. प्रारंभी कृषी विज्ञान केंद्राचे दीपक कच्छवे यांनी एल निनो, हवामान अंदाज आणि पर्जन्यमानविषयी माहिती दिली. संचालन तांत्रिक अधिकारी व्यंकटेश कुंटावार यांनी केले.
 
 
भरारी पथक व नियंत्रण कक्ष
खरीप हंगामासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात गुणनियंत्रण भरारी पथके, नियंत्रण कक्ष व समित्या नेमल्या आहेत. यात 36 गुणनियंत्रण निरीक्षक, जिल्हा भरारी पथक, तालुका व पंचायत समितीस्तरावर 32 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. तसेच कापूस तक्रार निवारण समिती, कृषी निविष्ठा सनियंत्रण समिती, जैवतंत्रज्ञान समिती स्थापन करण्यात आली आहे.
सर्वाधिक 4.96 लाख हेक्टरवर कापूसपेरा
जिल्ह्यात 9.15 लाख हेक्टरवर खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, तीळ, मका या पिकांचे नियोजन आहे. यामध्ये सर्वाधिक 4.96 लाख हेक्टरवर कापूस लागवड होणार आहे. त्यासाठी बीटी कापूस बियाण्यांच्या 27.33 लाख पाकीटांची गरज आहे. कंपन्याकडून 70 हजार पाकीटांचा पुरवठा झालेला आहे. त्यापाठोपाठ 2.27 लाख हेक्टरवर सोयाबीन लागवडीचे नियोजन आहे. त्यासाठी 2.11 लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. यात 14 हजार शेतकèयांनी 1.80 लाख क्विंटल घरचे बियाणे राखून ठेवलेले आहे. तर 1.08 लाख हेक्टरवर तूर लागवडीचे नियोजन आहे.
खतांचा साठा पुरेसा
युरिया, डीएपी, एमओपी, एसएसपी या रासायनिक खतांचा महिनानिहाय आवंटन व पुरवठा आराखडा तयार करण्यात आला आहे. 2.72 लाख मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी आहे. 6 मे पर्यंत 1.29 लाख मे. टन साठा उपलब्ध आहे. 1.17 लाख मे. टन खतसाठा विक्रेत्यांकडे शिल्लक असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी दिली.