नागपूर ४३.५ अंशांवर
पुढील चार दिवस यलो अलर्ट
नागपूर,
Heatwave Persists उष्णतेच्या विळख्यात सापडलेल्या नागपूरचा पारा शनिवारी घसरला. मात्र तीव्र लाट कायम असल्याने घाम निघत आहे. उष्णतेच्या लाटेत नागपूरसह संपूर्ण विदर्भ अक्षरशः होरपळून निघत असून शुक्रवारी नागपूरचा पारा ४५ वर पोहोचला होता.तर शनिवारी ४३.८ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. राज्यात सर्वाधिक ४६.० अंश तापमानाची नोंद अमरावती येथे झाली. शुक्रवारी अमरावतीचे तापमान ४५.६ अंश सेल्सिअस होते. हवामान विभागाने पुढील चार यलो अलर्टचा इशारा दिल्यामुळे नागपूरकांना उन्हाचा तडाखा सहण करावा लागणार आहे.
Heatwave Persists सकाळपासूनच उन्हाच्या झळा व उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. कुलरची थंड हवा प्रभावहीन ठरत आहेत. तापमान वाढीमुळे खाजगी व शासकीय रुग्णालयांमध्ये उष्माघात, निर्जलीकरण, उलट्या-जुलाब आणि श्वसनविकारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. उष्णतेच्या दाहकतेमुळे नागपूरचे जनजीवन विस्कळीत झाले असून, दुपारच्या नागरिक सावलीचा आधार घेताना दिसून येतात. सूर्याची आग ओकणारी किरणे आणि वाढते तापमान पाहता प्रशासनाने नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.