नवी दिल्ली
India Mediate इराणशी संबंधित कोणत्याही मुद्यांवर लष्करी कारवाई हा तोडगा नाही. इराण एका अकारण आक्रमणाचा बळी ठरला आहे. जर समोरची बाजू गंभीर असेल, तर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. अमेरिकेवर विश्वास न ठेवण्याची आमच्याकडे सर्व कारणे आहेत. या प्रदेशात शांततेसाठी भारताने मध्यस्थी करण्यासाठी पुढाका घ्यावा, भारताने घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करू अशी माहिती इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी शनिवारी पत्रपरिषदेतून दिली.
India Mediate ब्रिक्स सदस्य देशांच्या दोन दिवसीय शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी अराघची आले होते. मायदेशी परतण्यापूवी पत्रकारांशी संवाद साधताना अराघची म्हणाले, होर्मुझमध्ये अमेरिकेची नाकाबंदी कायम राहिल्यास कदाचित पुन्हा लढाई सुरू होऊ शकते. पण, आम्ही मुत्सद्देगिरीसाठीही तयार आहोत. अमेरिकेकडून येणाèया अविश्वास आणि परस्परविरोधी संदेशांमुळे सध्याच्या चर्चेत अडथळा येत आहे. मला आशा आहे की, अखेरीस मुत्सद्देगिरीचाच विजय होईल.
India Mediate इराणने कधीही अण्वस्त्रांची मागणी केलेली नाही आणि ते आमचे धोरण नाही. आमचा अमेरिकेवर अजिबात विश्वास नाही. कोणत्याही राजनैतिक प्रयत्नांमधील हा सर्वांत मोठा अडथळा आहे. भारताने शांतता चर्चेत मध्यस्थी करावी अशी आमची इच्छा आहे, असे अराघची म्हणाले.
India Mediate अत्यंत क्रूर युद्धात निकराचा लढा
आमच्याविरुद्ध पुकारल्या गेलेल्या अत्यंत क्रूर युद्धात निकराने लढा दिला. अमेरिकेला या संघर्षात कोणतीही उद्दिष्टे साध्य करता आली नाहीत. ज्या गोष्टी त्यांना लष्करी बळाने साध्य करता आल्या नाहीत, त्या वाटाघाटींच्या आधारे साध्य करता येणार नाहीत. संघर्षविराम टिकावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. जेणेकरून राजनैतिक चर्चेला संधी मिळू शकेल. आम्ही कोणत्याही दबावाला किंवा धमक्यांना कधीही बळी पडणार नसल्याचे अराघची म्हणाले.