लंडन
Sexually Exploiting ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचा इमाम अब्दुल हलीम खानला याला मुली आणि महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात ब्रिटनच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
Sexually Exploiting न्यायालयाने आरोपीला बलात्कार, मुलांसोबत लैंगिक अत्याचार आणि लैंगिक शोषण यासह 21 प्रकरणांमध्ये दोषी ठरवले आहे. लंडन पोलिसांच्या एका अधिकाèयाने सांगितले की, आरोपी स्वतःला धार्मिक आणि आध्यात्मिक शक्ती असलेला भासवायचा
Sexually Exploiting जिन्न आणि वाईट आत्म्यांची भीती दाखवून त्याने महिला आणि मुलींचे लैंगिक शोषण केले. पीडितांमध्ये 12 वर्षांपर्यंतच्या मुलींचाही समावेश होता. 2004 ते 2015 दरम्यान सात महिला आणि 14 मुलींवर अत्याचार केला. पूर्व लंडनमधील बांगलादेशी मुस्लिम समुदायात इमाम असल्याचा फायदा घेऊन लोकांची दिशाभूल करायचा. कुटुंबावर काळ्या जादूचा वापर करण्याची भीती दाखवल्याने अनेक मुली वर्षानुवर्षे गप्प राहिल्या. अखेर एका प्रकरणात त्याला अटक केल्यानंतर पीडितांनी त्याच्याविरोधात तक्रारी दाखल केल्याने त्याने केलेल्या अत्याचाराची माहिती समोर आली.