कोलकाता
Chief Minister Adhikari तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी आणि इतर नेत्यांच्या मालमत्ता आणि कंपन्यांच्या चौकशीचा आदेश शनिवारी मुख्यमंत्री शुभेन्दू अधिकारी यांनी पोलिस विभागाला दिले.
Chief Minister Adhikari राजकीय हिंसाचार आणि गुन्हेगारीच्या प्रकरणांचा तपास करण्याचा भाग म्हणून मालमत्तांची चौकशी केली जाणार असल्याचे शुभेन्दू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. उत्पन्नाचे स्रोेत आणि मालमत्तांचा ताळमेळ न दिसल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येईल. केंद्र सरकारच्या निधीतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी केली जाणार आहे. यासंदर्भात सरकारकडे अनेक तक्रारी आल्या आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्या ‘लिप्स अॅण्ड बाउंड्स’ या कंपनीच्या मालमत्तेची संपूर्ण यादी मिळाली असून, त्याची सखोल चौकशी केली जाईल.
Chief Minister Adhikari दंगलखोरांकडून भरपाई वसूल करणार
आसनसोलमधील नुकत्याच झालेल्या तोडफोडीच्या घटनेवर मुख्यमंत्री म्हणाले, या प्रकरणात आतापर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली आहे. सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाèयांकडून भरपाईची वसुली केली जाईल. त्यांच्या वैयक्तिक मालमत्ता जप्त करून लिलाव केला जाईल. त्यातून मिळणाèया पैशातून नुकसानीची भरपाई करणार आहे.