आजनसरा,
safety railings stolen टाकळी ते कान्होली मार्गावर ३५ वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून बांधलेला कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा तयार केला. परंतु, तो बंधारा असल्याचे तेवढे समाधान आहे. तो बंधारा आता चोरट्यांसाठी कुरण ठरत आहे. बंधार्याच्या लोखंडी प्लेट, सुरक्षा कठड्याचे पाईप व लोखंडी शेडची चोरी झाली आहे. यात पाणी वापर संस्थेचेही दुर्लक्ष कारणीभूत ठरत आहे.
या घटनेला ३ ते ४ वर्षे झाली असून पोलिसांना चोर सापडेना. संस्थेचे मुख्य प्रवर्तक रुद्रेश्वर सिंगण यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ३-४ वर्षांपूर्वी पाणी अडवण्यासाठी वापरण्यात येणार्या लोखंडी प्लेटा व पावसाळ्यानंतर लावण्यात येणार्या सुरक्षा कठड्याचे पाईप चोरीला गेले. याबाबत अल्लीपूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करूनही ३ वर्षे उलटली तरी पोलिसांना चोरीचा छडा लावण्यात अपयश आले आहे.
याबाबत मुख्य प्रवर्तक रुद्रेश्वर सिंगण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी धकादायक कबुली दिली. बंधार्याची देखभाल, व्यवस्थापन करणे आमच्या संस्थेला झेपत नाही असे सिंगण यांनी सांगितले. ज्या संस्थेकडे देखभाल, शेतकर्यांना पाणीपुरवठा व सुरक्षा कठडे लावण्याची जबाबदारी होती, त्याच संस्थेने हतबलता दर्शवली. त्यामुळे परिसरातील शेतकरी संतप्त झाले असून उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्यात येत आहे.safety railings stolen पाणी अडवण्यासाठी प्लेटाच नाहीत, सुरक्षेसाठी कठडेच नाहीत. परिणामी, हजारो हेटर शेतीचे सिंचन ठप्प झाले आहे. एकीकडे जलयुत शिवार, सिंचन वाढवा अशा घोषणा होत असताना दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या बंधार्यांकडे दुर्लक्ष होत आहे. ३ वर्षांपासून चोरीचा तपास नाही, संस्थेला व्यवस्थापन झेपत नाही म्हणते, शेतकरी पाण्याविना तडफडतोय. मग शासनाने लाखो रुपये खर्च करायचा कशासाठी? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.